Home महत्वाची बातमी आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी देऊळगावराजा बाजार समितीचे सचिव दोषी ,

आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी देऊळगावराजा बाजार समितीचे सचिव दोषी ,

158

सहाय्यक निबंधक यांचा जिल्हा उपनिबंधकांना अहवाल सादर; कारवाईकडे लक्ष ,

रवी अण्णा जाधव ,

देऊळगावराजा :- कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत गुरांच्या बाजारपोटी बाजार शुल्क म्हणून वसूल झालेल्या रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी शिवसंग्राम संघटनेने केलेल्या तक्रारीमध्ये बाजार समितीचे सचिव दोषी आढळले असून सदरील चौकशी अहवाल सहाय्यक निबंधक देऊळगावराजा यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे कारवाईसाठी पाठविला आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे व तालुका संघटक जहीर पठाण यांनी देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत दर आठवड्याला शनिवारी गुरांच्या बाजारापोटी वसूल झालेल्या शुल्क रकमेचा सचिव यांनी गैरवापर केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सदर तक्रारीची जिल्हा उपनिबंधक यांनी गंभीर दखल घेऊन सहाय्यक निबंधक देऊळगावराजा यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्याअनुषंगाने सहाय्यक निबंधक यांनी एस.सी.अग्रवाल यांची चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केले होती. १३ मार्च रोजी चौकशी अधिकारी यांनी तक्रारकर्ते व बाजार समितीचे सचिव यांच्या समक्ष बाजार समितीचे कॅश बुक व इतर आर्थिक रेकॉर्ड तपासले असता शिवसंग्राम संघटनेने केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आले आहे. व गुरांच्या बाजाराच्या शुल्कापोटी वसूल झालेली रक्कम स्वतः सचिव यांनी वापरल्याचे सिद्ध झाले आहे. याबाबतचा सखोल चौकशी अहवाल चौकशी अधिकारी यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठविला आहे.आता जिल्हा उपनिबंधक या प्रकरणात दोषींवर काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.