Home महत्वाची बातमी रेतीचा टिप्पर पलटला  ३ जण जागीच ठार, १ गंभीर २ जखमी

रेतीचा टिप्पर पलटला  ३ जण जागीच ठार, १ गंभीर २ जखमी

234
0

रेतीचा टिप्पर पलटला

३ जण जागीच ठार, १ गंभीर जखमी व २ जखमी

अजीम खान

दिग्रस –

घाटंजी तालुक्यातील शिवर घाटातून वाळूने भरलेला ट्रक दिग्रसकडे येताना आर्णी दिग्रस रस्त्यावरील दिग्रस तालुक्यातील लाख फाट्याजवळ आज सकाळी दि.२१ मार्च रोजी ५:३० वाजताच्या सुमारास पलटी झाल्याने भीषण अपघात घडला असून या अपघातात ३ मजूर जागीच ठार तर १ गंभीर जखमी २ जखमी झाल्याची घटना घडली.

चालक मनोहर नथुजी होलगरे (वय-४२) रा.सिंगद हा टिप्पर क्रमांक एम एच ३४ एम २७८३ चालवत असताना अचानक नियंत्रण सुटल्याने टिप्पर रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाला.टिप्परमध्ये असलेले ४ कामगार रेतीमध्ये दबले त्यामधील सहदेव महादेव भोरकडे (वय -२८), अविनाश लहू कांबळे (वय -२३),लखन पांडुरंग खटारे (वय -२५)रा. सिंगद,ता.दिग्रस या तिघांचा जागीच मृत्यू झाला. टिप्पर कॅॅबिन मधील गणेेेश नारायण होलगरे (वय -३२) हा गंभीर जखमी झाला असून प्रकृती चिंताजनक आहे.मनोहर नथुजी होलगरे (वय-४२) व गणेश प्रकाश सातपुते (वय -२०)रा.सिंगद या सर्व जखमींना यवतमाळ उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले यांना माहिती पडताच घटनास्थळी दाखल होऊन जखमींना दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी यवतमाळ रवाना करण्यात आले. मृतदेहाचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी टिप्पर चालक मनोहर नथुजी होलगरे रा.सिंगद व मालक अजय विठ्ठल भोयर रा.विराजनगर, दिग्रस यांच्याविरुद्ध भादवी कलम ३०४, ३४ नुसार गुन्ह्याची नोंद घेऊन पुढील तपास पोलीस निरीक्षक सोनाजी आम्ले,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत कडू,केशव चव्हाण व हनुमंता बोरकर करीत आहे.

फोटो –

Previous article“रेतीचा टिप्पर पलटला” , ३ जण जागीच ठार, १ गंभीर जखमी व २ जखमी…!
Next articleआर्थिक गैरव्यवहारप्रकरणी देऊळगावराजा बाजार समितीचे सचिव दोषी ,
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here