Home मराठवाडा चेक न वटल्याबद्दल आरोपीला 95 हजार रुपयाचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

चेक न वटल्याबद्दल आरोपीला 95 हजार रुपयाचा दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा

327

परतुर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांचा निकाल

लक्ष्मीकांत राऊत

परतूर प्रतिनिधी

परतुर येथील माननीय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी चेकची रक्कम न वाटल्यामुळे आरोपीला 95 हजार रुपये दंड आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा आणि दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की फिर्यादी जयप्रकाश राधाकिसन टेहरे यांनी आष्टी येथील फिरोज खान मियाखा यास 95 हजार रक्कम हात उसने म्हणून दिली होती फिरोज खान ने रक्कम परतीसाठी जयप्रकाश यांस 75 हजार रुपये रकमेचा चेक बुलढाणा क्रेडिट सोसायटी आष्टी शाखेचा दिला होता सदर चेकची रक्कम मिळण्यासाठी आरोपीच्या बँकेतील खात्यात चेक लागू केला असता तो रक्कम खात्यात पुरेशी नाही म्हणून नव्हता फिर्यादीला बँकेने परत केला तेव्हा फिर्यादीने एडवोकेट दिनकर प्रभाकर पाटील गोळेगावकर यांचे मार्फत कलम 138 चेक व्यवहार प्रक्रिया कायद्याखाली आरोपी विरुद्ध कार्यवाही दाखल केली चौकशीअंती न्यायालयाने फिर्यादीच्या बाजूने निकाल देत आरोपी फिरोज खान यास 95 हजार रुपये दंड ठोठावला आणि कोर्ट उठेपर्यंत शिक्षा केली याशिवाय दंड न भरल्यास सहा महिने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली विशेष म्हणजे दंडाची रक्कम फिर्यादीला देव विण्याचे आदेश आरोपीला दिले आहेत फिर्यादी जयप्रकाश टेहरे तर्फे एडवोकेट दिनकर प्रभाकर पाटील गोरेगावकर यांनी काम पाहिले.