Home जळगाव मुस्लिम मंच्या धरणे आंदोलनाचा 74 वा दिवस संपन्नपंतप्रधान- मुख्यमंत्री व शरद पवार...

मुस्लिम मंच्या धरणे आंदोलनाचा 74 वा दिवस संपन्न
पंतप्रधान- मुख्यमंत्री व शरद पवार यांना लेखी निवेदन दिले- प्रतिभा शिंदे

76
0

रावेर शरीफ शेख

जळगाव मुस्लिम मंच तर्फे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाचा सोमवार ७४ वा दिवस या दिवशी लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादी अल्पसंख्यांक महाराष्ट्राचे अध्यक्ष गफ्फार मलिक, ओबीसी संघटनेचे अमोल कोल्हे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे ,मौलाना आझाद विचार मंचचे उपाध्यक्ष करीम सालार, अंजुमन बिरादरीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष डॉक्टर अमानुल्ला शाह, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी रागिब ब्यावली, मेमन बिरादरीचे अखिल भारतीय पातळीवरील सदस्य मजीद जकेरिया, मुलतानी बिरदारीचे फिरोज मुलतानी,एम आय एम चे नगर सेवक रियाज़ बागवान,मनियार बिरदारीचे शेख हसन, सलीम मोहम्मद व हारून शेख,सुन्नी मौलाना शरीफ शाह, आदींच्या उपस्थितीने हा विरोध नोंदविन्यात आला
आंदोलनाला महिलांची लक्षणीय उपस्थिती
धरणे आंदोलनाची सुरुवात शकील करीम बागवान यांनी केली तर मंचे समन्वयक फारुक शेख यांनी मंगळवारी ७५ व्या दिवसाचे धरणे आंदोलनाचे औचित्य साधून उपस्थित आंदोलकांना आव्हान केले की उद्या ७५ वयोगटातील वृद्ध पुरुष व महिला यांच्या नावे हे आंदोलन राहणार असून त्यासाठी जास्तीत जास्त वृद्ध पुरुष महिलांनी हजर राहावे अशी विनंती केली.

सुलताना युनूस शेख या महिलेने केंद्रशासन कशा प्रकारे आमचा छळ करीत आहे हे उपस्थितांसमोर उदाहरणासहीत स्पष्ट केले त्यापुढे जाऊन वाजिदा शेख वाजिद या महिलेने विश्व मध्ये आमच्या पंतप्रधान व गृहमंत्री यांच्या प्रशासनावर कशाप्रकारे शंका घेतली जात आहे हे विदीत केले सायमा जाकीर सय्यद यांनी बायकॉट करण्यासाठी आपले विचार मांडले आलिया शेख यांनी तर कविता सादर करून आंदोलनाला एक वेगळी दिशा दिली.
प्रतिभा शिंदे यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माननीय शरदरावजी पवार राष्ट्रवादी अध्यक्ष यांना लेखी स्वरुपात निवेदन दिले असून संपूर्ण विश्व मध्ये कोरोना व्हायरसमुळे हाहाकार माजलेला असून भारतात जर एनपीआर मुळे लोकांच्या भावना दुखावत असतील तर त्याला एक वर्षासाठी स्थगित करा व नंतर त्यावर राज्यसभा लोकसभेत चर्चा करून त्यावर निर्णय घ्या या प्रकारचे निवेदन दिले असून त्यावर कारवाई होईल असे त्यांनी आश्वासित केले
मुफ़्ती हारून नदवी यांनी कोरोना व्हायरस बाबत माहिती देताना त्यापासून कशा प्रकारे बचाव करावा हे आंदोलकांना समजून सांगितले. करीम सालार व गफ्फार मलिक यांनी मार्गदर्शन केले. अकील मन्यार, अल्ताफ शेख यांचीही समयोचित भाषणे झाली.
यांची होती उपस्थिती
जुबेदा सय्यद चाँद,शबीना बी,कुलसम बी,मारिया हारिश, सैयद अबरार,फरजाना शेख,वाज़ेदा शेख,सना परवीन,नज़मा हुसेन,रोशन खान,गुलाम दस्तगीर,अनीस शाह,इद्रीस बाबा बागवान,शबनूर शेख,हसीना बी शेख,सायमा सैयद, अनीस शाह,खलील टेलर,अलफैज पटेल,कलिम बेग,अरबिना बेग,समरीन बी.

जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी लाडवंजारी यांना निवेदन सबा अब्‍दुल कयूम, सादिया कयूम, सायमा जाकीर, शबनम जाकीर, सुलताना शेख, हमीदा बी, हसीना बी, तहुरा बी, मेहमुदा बी, शेख युसुफ, जगन्नाथ केशव पाटील ,शमशोद्दीन शेख, अल्ताफ खाटीक, गुलाम दस्तगीर यांनी जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी विकास लाडवंजारी यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.