नागपूर

प्रियकराने प्रियेसीचा गळा आवळून केली हत्या ,

Advertisements
Advertisements

अमीन शाह

नागपूर

प्रियकराने एका युवतीला प्रेमपाशात ओढून लग्नाचे आमिष दाखविले. दरम्याने दोघांनीही प्रेमात आनाभाका घेतल्या. हे प्रेमसंबध गेल्या तीन वर्षापासून सुरु होते. दरम्यान प्रेयसीने सतत लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे संतप्त प्रियकराने एका निर्जनस्थळी नेऊन प्रेयसीचा गळा आवळून खून केला. ही खळबळजनक घटना आज सोमवारी पहाटेच्या सुमारास सदरमधील मंगळवारी कॉम्पलेक्समध्ये उघडकीस आली. हुस्ना जबीन शेख (२१) रा. गोरेवाडा, असे खून झालेल्या युवतीचे नाव आहे. तर आसिफ शेख (२६) रा. गिट्टीखदान, असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. याप्रकररणी गिट्टीखदान पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी प्रियकरास अवघ्या चार तासात अटक करण्यात यश मिळविले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हुस्ना शेख ही सीताबर्डीतील एका नामांकित मोबाईल शॉपीमध्ये सेल्सगर्ल म्हणून कामावर होती. गेल्या तीन वर्षापूर्वी हुस्नाची आसिफ शेख याच्याशी ओळख झाली. आसिफ हा ट्रक चालक आहे. दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दरम्यान आशिफने तिला लग्नाचे आमिष दाखविले. मात्र, दोघांच्याही घरून लग्नास विरोध होता. दरम्यान हुस्नाने त्याच्या मागे वारंवार लग्नाकरीता तगादा लावला. शेवटी त्याने जानेवारी २०२० मध्ये लग्न करण्याचे आमिष दाखविले. मात्र, घरच्यांचा विरोध पाहता त्याने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. घरातील परिस्थिती सुधारल्यावर लग्नाचा विचार करण्याचे त्याने हुस्नाला सांगितले. मात्र, हुस्ना लग्नाच्या निर्णयावर ठाम राहिली. रविवार असल्यामुळे दोघांनी भेटून बोलणी करू असे ठरविले. त्यामुळे रविवारी सायंकाळी दोघेही सदरमधील मंगळवारी बाजारात भेटले.त्यानंतर दोघेही शारदा चौकात फिरायला नेले. येथे नाश्ता केल्यानंतर दोघेही पुन्हा मंगळवारी बाजारात परतले. रात्रीच्या सुमारास हुस्नाला घेऊन तो एका कॉम्पलेक्सच्या बेसमेंटमध्ये गेला. यावेळी दोघात पुन्हा लग्नाच्या कारणावरुन वाद उद्भवला. त्यामुळे आरोपी प्रियकर संतप्त झाला. आणि त्याने कायमचा काटा काढण्याचा निश्चय मनात केला. मात्र आज आपला जीवलग प्रियकरच आपल्या जीवावर उठेल याची कल्पना हुस्नाला नव्हती. दरवेळीप्रमाणे याही वेळी आशिफ तिला आपल्या बाहुपाशात घेतले. कल्पना नसलेली हुस्ना डोळे मिटत नाही तोच त्याने स्कार्पने गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. सोमवारी बेसमेंटमध्ये युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन मृतदेह ताब्यात घेऊन मेयोत रवाना केला. या प्रकरणी सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. दरम्यान गिट्टीखदान पोलिसांनी सतर्कता दाखवित आरोपी आसिफ शेखला सापळा रचून अटक केली.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

वर्धा फ्लँश.

इकबाल शेख वर्धा / आर्वी  – वर्धा जिल्हा आर्वी तालुका येथील तळेगाव पोलिस स्टेशन अंतर्गत ...