Home महत्वाची बातमी त्याने चिमुकल्या मुलावरच केला बलात्कार ,

त्याने चिमुकल्या मुलावरच केला बलात्कार ,

42
0

खळबळजनक घटना ,

अमीन शाह

चंद्रपूर

कोरपना तालुक्यातील निमणी येथे इयत्ता पाचवीत शिकणार्‍या विद्यार्थ्यावर नरधमाकडून लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आज दि. १५ ला सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान घडली असून माणुसकीला काळिमा फासणार्‍या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे.महादेव उत्तम गोंडे (२८) रा. निमणी असे आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात पीडित मुलाने व त्याच्या परिवाराने तक्रार दाखल केली असून त्याचेवर भां.द.वी.३७७ चे ४/८/१० (३२५) पोस्को व अट्रासीटी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे पीडित मुलगा ११ वर्ष व त्याचा मित्र वय १५ हे दोघेही गावाजवळील शेतात बकर्‍या राखत असताना आरोपीने तुम्हाला हरभरा देतो म्हणून स्वतःच्या शेताकडे मोटारसायकल वर बसवून घेऊन गेला व रांजीच्या झाडाखाली मोटारसायकल ठेवली व त्यांना त्यांना कपडे काढायला सांगितले असता तिथून दोघांनीही पळ काढल्याने आरोपी त्या दोघांच्या मागे धावू लागला व पीडित मुलगा वय ११ वर्ष यांना पकडून त्याला खांद्यावर उचलून शेतात घेऊन गेला व त्याचे पाय शेतातील वेलांनी बांधून त्याला मारझोड करून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला अत्याचारामूळे पीडित विद्यार्थी जखमी झाला असुन त्यांने व त्याच्या मित्रांने घटनेची माहिती आपल्या आईला दिली आईने व पिडीत मुलाने गडचांदूर पोलीस ठाणे गाठून आपबिती कथन केली. पोलीस निरिक्षक गोपाल भारती यांनी शहानिशा करून गुन्हा दाखल करून नराधम महादेव उत्तम गोंडेला अटक करुन सोमवारी न्यायालयात हजर केले असता सात दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांचे मार्गदर्शनात तपास सुरु आहे अल्पवयीन मुला , मुलीवरील लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढत असल्याने नागरिकांनी नराधमाला फाशीच्या शिक्षेची मागणी करण्यात आली असून मोर्चा काढणार असल्याची माहिती आहे.

Unlimited Reseller Hosting