Home मराठवाडा गांजा प्रकरणातील आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी

गांजा प्रकरणातील आरोपीला तीन दिवसाची पोलिस कोठडी

123
0

लक्ष्मीकांत राऊतपरतूर: प्रतिनिधी
परतूर तालुक्यातील मौजे सातोना येथे दोन दिवसापूर्वीच जवळपास पंधरा किलो गांजा ज्याची किंमत एक लाख 48 हजार 360 रुपये आहे पोलिसांनी छापा मारून बाळू आकात याला ताब्यात घेतले यावेळी आरोपी बाळू आकात हा पोलिसांना तपास कामी सहकार्य करत नव्हता शिवाय उडवाउडवीचे उत्तर देत असल्याने प्रथमवर्ग न्यायाधीश यांच्याकडे अधिक तपासासाठी पोलीस अधिवक्ता श्री सुबोध किनगावकर यांनी आरोपी यांच्याकडून अधिक माहिती काढण्यासाठी व सदरील गांजा कुठून आणला यातील इतर आरोपी किती व कोण आहेत त्यांना अटक करणे यासह इतर तपास कामासाठी व याबाबत अधिक माहिती काढण्यासाठी सरकारी पक्षाच्या वतीने पोलीस कोठडीची मागणी केली होती यावर माननीय न्यायाधीश पी एन कोकाटे यांनी सरकार पक्षाची मागणी मान्य करून आरोपीला 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले त्यावेळी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील सुबोध किनगावकर यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणाचा तपास विशेष पोलीस अधिकारी श्री एन पी तांबे हे करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting