Home जळगाव बहुजन क्रांती मोर्चा तर्फे NRC, CAA, EVM, NPR च्या विरोधात रावेर तहसिल...

बहुजन क्रांती मोर्चा तर्फे NRC, CAA, EVM, NPR च्या विरोधात रावेर तहसिल कार्यालयावर रॅली प्रदर्शन

17
0

रावेर (शरीफ शेख)
येथे बहुजन क्रांती मोर्चा रावेर युनिट तर्फे रावेर तहसील कार्यालयावर NRC, CAA, EVM, NPR च्या विरोधात तहसील स्तरीय रॅली प्रदर्शन आज दि.१६/०३/२०२० सोमवार रोजी ठीक सकाळी 11 वाजेला बहुजन क्रांती मोर्चा रावेर तालुका संयोजक मा. नितीन गाढे सर यांचे नेतृत्वामध्ये करण्यात आले OBC प्रवर्गातील जनतेची जाती निहाय जनगणना झालीच पाहिजे, NRC हटाव देश बचाव, CAA हटाव देश बचाव, EVM हटाव देश बचाव, संविधान बचाव देश बचाव, गैर साविधानिक NPR बंद करो, व इतर घोषणा रॅली प्रदर्शन करत असताना देण्यात आल्या रेली मध्ये प्रामुख्याने कामगार नेते दिलीप कांबळे, साहेबराव वानखेडे, सुधीर सैंगमिरे, रविंद्र इंगळे, मुस्लीम पंच कमिटीचे शेख गयास शेख, रशीद युसुफ खान, इब्राहीम खान, शेख इरफान शेख कुतुबुद्दीन, नगरसेवक शेख सादिक,शेख नजीर शेख बशीर, जमायते इस्लामी हिंद चे शफ़िउद्दीन शेख कासम, प्रदीप सपकाळे, निसार खान, शेख मंजूर शेख कादर, अब्दुल रफ़िक़ व शेकडो कार्यकर्ते रॅलीमध्ये सहभागी होते रॅली संपन्न झाल्यावर एन.पी.आर.बॉयकॉट म्हणुन 26 मार्च रोजी भारत बंदची घोषणा करण्यात आली.तहसिल कार्यालया समोर घोषणा देऊन तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी रावेर पोलिस स्टेशनचे पी.आय. रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.