Home मराठवाडा आखेर , त्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश ,

आखेर , त्या शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश ,

55
0

बदनापूर/सय्यद नजाकत

ग्राम पंचायतीने जिल्हा परिषद शाळेत सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यध्यापक व शिक्षकांत वाद होऊन थेट जिल्हा परिषद मुख्य अधिकाऱ्याकडे तक्रारी झाल्या असता १६ मार्च रोजी सुनावणी होऊन जिल्हा परिषद मुख्य अधिकारी निमा अरोरा यांनी ४ शिक्षकांच्या बदल्या करण्याचे आदेश देऊन त्या शिक्षकांची कान उघडणी केली आहे
बदनापूर तालुक्यातील किन्होळा येथे जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक शाळा इयत्ता सातवी पर्यंत चालविली जाते या शाळेत १०५ विद्यर्थी ज्ञानार्जन करीत असून मुख्यध्यपकांसह ५ शिक्षक ज्ञानदानाचे काम करतात परंतु शाळेतील शिक्षक ज्ञान कार्य सोडून जास्त मोबाईलवर लागलेले असतात व गैरहजर राहून दुसऱ्या दिवशी हजेरी रजिस्टरला स्वाक्षरी करतात अश्या तक्रारी वाढल्याने किन्होळा ग्राम पंचायतीने शाळेत सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेतला
शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत पालकांच्या तक्रारी वाढल्याने शाळेत सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा महत्वपूर्ण निर्णय झाल्याने सदर निर्णय शाळेतील शिक्षकांना रुजला नाही आणि मुख्यध्यापक प्रकाश गिरी व शिक्षकांमध्ये वाद झाला ,११ मार्च रोजी शाळेलतील शिक्षक तसेच मेव्हणा येथील एका शिक्षकाने या वादात शिरून वाद आणखीनच वाढविला शाळेतच मुख्यध्यापक व शिक्षकांमध्ये मारामारी झाली असता ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले व १२ मार्च रोजी सरपंच भीमराव भुजंग व इतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषद जालना गाठून सर्व शिक्षकांच्या बदल्या करण्याची मागणी करून निवेदन दिले तसेच मुख्य अधिकारी डॉ.निमा अरोरा यांची भेट घेण्याच्या प्रयत्न केला मात्र मुख्य अधिकाऱ्यांनी भेट नाकारली
दरम्यन जिल्हा परिषद किन्होळा येथील मुख्यदयपाक व शिक्षकांचा वाद वाढल्याने गट शिक्षणाधिकारी सूर्यकांत कडेलवार यांनी मुख्य अधिकाऱ्यांना अहवाल पाठविला तसेच सहशिक्षिका श्रीमती म्हसे,श्रीमती ओंकारे,श्रीमती पठारे, श्री रेड्डी यांनी देखील मुख्यध्यापक प्रकाश गिरी यांच्या विरुद्ध तक्रार दिली असता मुख्याधिकारी डॉ.निमा अरोरा यांनी १६ मार्च रोजी जिल्हा परिषद दालनात सुनावणी आयोजित केली होती या सुनावणी दरम्यन मुख्यध्यपक प्रकाश गिरी यांनी आवश्यक पुरावे सादर केल्याने शिक्षकांची गोची झाली व मुख्यध्यपक वगळता इतर शिखकांची तातडीने इतरत्र बदली करण्याचा निर्णय दिला