Home मुंबई बापरे ! कोरोनाबाधिताच्या संपर्कामुळे हिंदुजातील ८२ कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाईन

बापरे ! कोरोनाबाधिताच्या संपर्कामुळे हिंदुजातील ८२ कर्मचाऱ्यांना केलं क्वारंटाईन

226

राजेश भांगे

मुंबई – जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. जगात तब्बल ४००० पेक्षा जास्त लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे. डॉक्टरांना अद्याप कोरोनावर औषध मिळालं नाहीये. मुंबईतही कोरोनाचे ४ रुग्ण आढळले आहेत. त्याच पार्श्वाभूमीवर हिंदुजा रुग्णालयातील तब्बल ८२ कर्मचाऱ्यांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.
याचं कारण ऐकलं तर तुम्हाला धडकी भरेल. मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात एका रुग्णाला ठेवण्यात आलं होत. काही दिवसांनी हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं पुढे आलं. रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचं समजताच हिंदुजातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पायाखालची जामी सरकली. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेय सर्वांना आता क्वारंटाईन करण्यात आलंय. आपल्या घरातच आपण कुणाच्याही संपर्कात न येता राहावं असं डॉक्टरांकडून सांगण्यात आलंय.