
सर्वत्र खळबळ ,
अमीन शाह
परभणी
चारित्रावर संशय घेत पोलीस पत्नीचा खुन करून पतीने आत्महत्या केल्याची घटना खानापुर नगर परिसरात घडली. कमल जाधव (माने) वय २५ वर्ष असे मयत पोलीस कर्मचारी महिलेचे नाव आहे. महिलेचा पती कृष्णा धोंडीबा माने वय २९ वर्ष याने वस्त्तरयाच्या सहाय्याने पहिले पत्नीचा खुन केला. त्यानंतर स्वताच्या मानेवर वस्तरयाचे वार करून आत्महत्या केल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरीकांनी सांगीतले की, पती पत्नी बाहेर गेले होते. घरी आल्या नंतर त्यांच्यात शुल्लक कारणाने वाद झाला. वाद होत असल्याचे पाहत कृष्णा माने याचा भाऊ आणि भाऊजय लहान मुलाला घेवून शेजारी काकाकडे गेले. त्यांनंतर वाद विकोपाला गेल्याने कृष्णा माने याने पत्नीवर वस्त्तरयाने वार केले. कमल जाधव हिचा मृतदेह बेडरूम मध्ये पडलेला होता. कृष्णाने स्वताच्या गळ्यावर वार करून आत्महत्या केली. कृष्णा हा व्यवसायाने शेतकरी असून त्याला व्यसन होते असे उपस्थितांनी सांगीतले. मयत कमल जाधव ही चारठाणा येथे कार्यरत असतांना तीने कृष्णा विरोधात छळ केल्याची तक्रार दिली होती. कमलचे मुळगाव वसमत तालुक्यातील ईरेगाव आहे. तर कृष्णाचे मुळगाव पिंपरी देशमुख आहे. कृष्णाचे वडील भारतीय सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेले असून सध्या शेती करतात. पतीने पत्नीचा खुन केल्याची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस अधिक्षक नितीन बगाटे, पो.नि. रामेश्वर तट, सपोनी बनसोडे आणि कर्मचारयांनी घटणास्थळी धाव घेतली. पोलीस अधिक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनीही घटनास्थळाला भेट देवून अधिक माहिती जाणून घेतली. घटनास्थळावर ठसे पथकाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशीरापर्यंत सदर प्रकरणी कारवाई करण्याची प्रक्रीया सुरू होती