Home विदर्भ शिवशाहीच्या धडकेत तिघांचा मृत्यू , दोघे जागीच ठार तर

शिवशाहीच्या धडकेत तिघांचा मृत्यू , दोघे जागीच ठार तर

213
0

ऑनलाईन पोलीसवाला मिडिया टिम

एकाचा उपचार दरम्यान मृत्यू

वर्धा – अहेरी नागपुर शिवशाही बस आणि मोटरसायकलचा नागपूर चंद्रपूर महामार्गावर बरबडी गावाजवळ झालेल्या भिषण अपघातात मोटरसायकल वरील दोन तरुनाचा जागीच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला त्याला दवाखान्यात उपचारार्थ नेले असता तो सुद्धा उपचारादरम्यान मरन पावल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
नागपुर वरुन चिखली ता. समुद्रपूर येथे राहणारे दोन भाऊ आणि एक मित्र मोटरसायकल क्रमांक एम. एच. ३४ ए सी ४१७६ ने गावाकडे येतांना नागपुर चंद्रपूर महामार्गावर बरबडी गावाजवळ शिवशाही एम. एच. ०६ इ. डब्ल्यू. ३६३८ क्रमांकाच्या नागपूर – अहेरी शिवशाही सुपर बस मध्ये आल्याने मोटरसायकल वर स्वार रोशन अरून भोयर (वय २६ वर्षे) आणि अशोक देवाजी तालवटकर (वय२६ वर्षे) या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तर तिसरा नितिन देवाजी तालवटकर (वय २४) हा गंभीर जखमी झाला त्याला दवाखान्यात उपचारार्थ नेले असता तो सुद्धा उपचारादरम्यान मरन पावल्याने एकाच गावातील दोन भाऊ आणि एका मित्रावर काळाने झडप घातल्याने चिखली गावावर शौककळा पसरली आहे .

सिंदी पोलिसात सदर गुन्हाची नोंद करण्यात आली असुन पुढील तपास ठाणेदार प्रशांत काळे करीत आहे.