Home मराठवाडा बापरे… हिंगोलीत सापडले करोना चे दोन रुग्ण ,

बापरे… हिंगोलीत सापडले करोना चे दोन रुग्ण ,

50
0

सर्वत्र उडाली खळबळ ,

गुरुदत्त हाडे

हिंगोली – रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले हिंगोली : कोरोना व्हायरसचे दोन संशयित आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या दोन संशयित रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथामिक उपचार सुरू आहे. कोरोनाचे हे दोन संशयित बाहेरून आले आहे. एक पुण्यातून आला आहे. तर दुसरा दुबईतून हिंगोलीत आला आहे. या दोघांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. कोरोना व्हायरसबाबत नागरिकांना काळजी घेण्याचे प्रशासनाने म्हंटले आहे. त्याचबरोबर नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासन करत आहे.