Home मराठवाडा सरकार देशात आरजकता माजवण्याच्या प्रयत्नात – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

सरकार देशात आरजकता माजवण्याच्या प्रयत्नात – अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

128
0

राजेश भांगे

औरंगाबाद , दि. १४ :- देशाची आर्थिक परिस्थिती ढासळली असून, त्याबद्दल केंद्र सरकारला चिंता वाटत नाही. आर्थिक परिस्थितीत हाताळण्यात केंद्राला अपयश येत आहे. हे अपयश लपविण्यासाठी देशात आरजकता माजवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
भटके विमुक्त आदिवासी परिषदेला संबोधीत करण्यापुर्वी सुभेदारी विश्रामगृह येथे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. एनपीआर, एनआरसी आणि सीएए चा देशभरात विरोध होत आहे. केंद्र सरकार विरोध करणाऱ्यांना भिती घालण्यात येत आहे. आंदोलनात कोणी सहभाग घेतला त्यांची नावे नागरिकत्व कायद्यातून कायमची वगळण्यात येऊ शकतात, असे वातावरण निर्माण केले जात आहे. त्यामुळेच आंदोलन करणारी फळी कमकवुत होईल.
साधारण एप्रिल- मे नंतर आणखी परिस्थिती चिघळेल असे त्यांनी सांगीतले. एस बँकेच्या पाठोपाठ लवकरच देशभरातील मोठ्या पाच बँका बंद होण्याचा मार्गावर आहेत, या सर्वच परिस्थितीत उठाव होण्यापुर्वीच आरजकता माजवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. आसाम मध्ये नागरिकत्व कायदा लागू करत असताना १९ लाख २० हजार नागरिकांची विशेष कार्ड देण्यात आले आहे. या सर्वांची डिटेन्शन कँम्पमध्ये रवानगी करण्यात आली आहे. त्यात १९ लाखांपैकी १४ लाख २० हजार नागरिक हिंदू आहे तर उर्वरित मुस्लिम आहे. हिंदूना नागरिकत्व कसे देणार हे सरकारने स्पष्ट करावे असे आवाहन अ‍ॅड. आंबेडकर यांनी केली.
सरकारने कोरोनाची भिती उभी करत असून लोकसंख्येच्या तुलनेत आपल्याकडे रुग्ण नगन्य आहे. त्याचा बाऊ केला जात असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी यावेळी सांगितले. महापालिकेच्या निवडणुकांच्या अनुशंगाने बोलताना ते म्हणाले की, संकट येत असतात, त्यामुळे निवडणुका स्थगीत करणे हा पर्याय नाही. प्रशासनाने मार्ग काढून महापालिकेच्या निवडणूका ठरलेल्या मुदतीत घेतल्या पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या पत्रकार परिषदेस अ‍ॅड. धनराज वंजारी, प्रा. किसन चव्हाण, डाँ. नितीन सोनवणे, अमित भूईगळ, फारूख अहमद, अरुण जाधव, प्रभाकर बकाले, भरत दाभाडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleक्या यही है सबका साथ सबका विकास और सबका विश्वास है – शेख नाजीया
Next articleझिंगाट’ गाण्यावर महिला पोलीस अधीक्षकांचा ठेका! तुफान डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here