Home उत्तर महाराष्ट्र झिंगाट’ गाण्यावर महिला पोलीस अधीक्षकांचा ठेका! तुफान डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल

झिंगाट’ गाण्यावर महिला पोलीस अधीक्षकांचा ठेका! तुफान डान्सचा व्हिडीओ तुफान व्हायरल

63
0

नाशिक , दि. १४ ; ( राजेश भांगे );-
नाशिक महिला ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी झिंगाट गाण्यावर डान्स केला. कामाच्या व्यापातून आणि कामाचा ताण असतानाही त्यांनी काही वेळ महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत डान्स केला आहे. पोलिसांच्या वर्दीतील डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात रंगपंचमीच्या निमित्तानं गाणी लावण्यात आली होती. रंगपंचमी खेळली जात होती. याच आनंदात महिला पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी झिंगाट गाण्यावर ठेका धरला. त्यांच्या या तुफान डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रंगपंचमीच्या निमित्तानं सर्व महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झिंगाट गाण्यावर मनसोक्त डान्स केला. कामाचा ताण आणि थकवा विसरून मोठ्या उत्साहात ह्य़ा सर्वांमध्ये झिंगाट गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळाल्या आहेत.
कामाच्या व्यापातून आणि कामाचा ताण असतानाही त्यांनी काही वेळ महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसोबत डान्स केला आहे. पोलिसांच्या वर्दीतील डान्सचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.