Home जळगाव क्या यही है सबका साथ सबका विकास और सबका विश्वास है –...

क्या यही है सबका साथ सबका विकास और सबका विश्वास है – शेख नाजीया

70
0

धरणे आंदोलन 73 व्या दिवशी सुरूच…!

कोरोना व्हायरस पुस्तिकेचे प्रकाशन

रावेर – शरीफ शेख

जळगाव मुस्लिम मंच तर्फे जिल्हाधिकारी कार्यालय बाहेर सुरू असलेल्या राष्ट्रीय जनसंख्या नोंदणि व भारतीय नागरिकत्व सुधारणा कायद्याला विरोध म्हणून धरणे आंदोलनाचा शनिवार ७३वा दिवस या दिवशी जळगाव शहरातील सर्व आलेमा व हाफिज महिला व शिक्षिका यांच्यासह पुरुष महिलांचा सक्रिय सहभाग होता.

*धरणे आंदोलनात महिलांची आर्त हाक*
आलेमा नाजिया शेख यांनी मागील तीन महिन्यापासून ज्या महिला कधी घराबाहेर पडल्या नाही त्या महिलांना या सरकारने रस्त्यावर आणून बसवले त्यामुळे आमच्या घरातील मुलाबाळांच्या अभ्यासावर आमच्या मानसिक व आर्थिक परिस्थितीवर याचा परिणाम होत असून आमच्यासोबत पंतप्रधानांची साथ विकास व विश्वास यालाच म्हणावे का अशी आर्त हाक मारून आपल्या व्यथा मांडल्या त्यांच्याच भाषणाची रीग धरून रुबीना शरीफ हिने हेच पंतप्रधान आहेत का ज्यांनी ट्रिपल तलाक च्या वेळेस आम्हाला बहिणी संबोधून तुम्हाला मी न्याय देईल अशी भावना प्रकट केली होती त्यापुढे सय्यद जाकीरा यांनी तर या देशातील महिलांसोबत जर असा अत्याचार होत असेल तर एक दिवस येईल की या महिलांमध्ये राणी लक्ष्मीबाई व रजिया सुलतान निर्माण होतील व त्याचा परिणाम या शासनाला भोगावा लागेल असे बोलून त्यांनी आपल्या भावना वाट करून दिली.
*यांनी केले मनोगत*
नगरसेवक रियाज बागवान, अल्ताफ शेख, युसुफ शेख, माजी नगरसेवक सय्यद फारुक, कलीम पेंटर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

शेवटी अब्दुल करीम सालार यांनी कोरोना व्हायरस वर एक छोटीशी पुस्तिका तयार केली तिचे प्रकाशन उपस्थित धरणे आंदोलकांच्या हस्ते करण्यात आले सोमवारपासून या पुस्तिकेचे वाटप जळगाव शहरात आंदोलकांना मार्फत करण्यात येईल असे सांगून सालार यांनी यावेळी समाजाला मुख्य प्रवाहात येण्याचे आव्हान केले.
फारुक शेख यांनी या ७३ व्या धरणे आंदोलनाचे समारोप करताना अत्यंत अत्यंत दुःख व्यक्त करू या सरकारच्या एन पी आर,एन आर सी बाबत लोक सभेत व राज्य सभेत दिशा भूल करीत असल्याने दुःख व्यक्त करून ही लढाई आम्ही शेवटपर्यंत लढू व त्यासाठी संपूर्ण समाजाची साथ हवी असे आव्हान केले.

*यांची होती विशेष उपस्थिती*

सुरेश मराठे, प्राध्यापक डॉक्टर इकबाल शेख,आयाज मोहसिन, आसिफ़ देशपांडे,शेख रुबीना शेख इक्बाल, सकिना शेख इस्माईल, खातून शेख मजीद, सबनूर शेख साबिर, सय्यद नूर, शेख सलीम रमजान ,अब्दुल रउफ रहिम, शेख रिजवान प्राध्यापक डॉक्टर एम इक्बाल, अब्दुल गुलाम दस्तगीर ,शेख रफिक करीम,अन्वर सिकलीगर, शकील बागवान, शेख हसन, खलील टेलर, मोहम्मद युनुस, जाफरखान शेख, नोमान मिसबा शेख, मारिया शेख, शमीम अब्दुल्ला, शहनाज बी, शमीना बी, रुकसाना बी ,सलिमा बी, अमिनाबी सय्यद, शकीला शेख, जावेद अहमद, शेख मुनीर बागवान, समीर शेख, शरीफ शाह, शेख रईस आदींची उपस्थिती होती.