Home महाराष्ट्र प्रत्येक व्यक्तीसमोर एकतरी आदर्श असावा – सुषमा शाह

प्रत्येक व्यक्तीसमोर एकतरी आदर्श असावा – सुषमा शाह

140

जागतिक महिला दिनानिमित्त महिला क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…

जीवन महाजन

नंदुरबार – प्रत्येक व्यक्तीसमोर एकतरी आदर्श असावा. थोर व कर्तृत्ववान पुरुषाच्या प्रेरणेतून आपले जीवन घडते. लक्ष साध्य करताना आपल्या जीवनात अनेक अडचणी येतील. त्यावर मात करीत मार्ग काढल्यास यश प्राप्ती साध्य होत असते, असे प्रतिपादन श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुल मुख्याध्यापिका सुषमा शाह यांनी केले.
नंदुरबार येथील सार्वजनिक शिक्षण समिती संचलित श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कुलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिला क्रिकेट सामन्याचे आयोजन शनिवार दि.७ मार्च २०२० रोजी करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा शाह ह्या होत्या. स्पर्धेचे उद्घाटन शाळेचे उपमुख्याध्यापक राजेश शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका विद्या सिसोदिया, जगदिश पाटील, क्रीडा प्रमुख दिनेश ओझा आदी मान्यवर उपस्थित होते. या क्रिकेट स्पर्धेत पी.व्ही.सिंधु, मिताली राज व स्मृती मंदाणा यांच्या नावाने तीन संघ तयार करण्यात आले. या तिरंगी स्पर्धेत मिताली राज या संघाने विजय मिळविला. यात कर्णधार प्रिती राजभोज, उन्नती कलाल, नंदीनी सोनार आणि श्रेया शाह यांनी उत्कृष्ठ खेळत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या विजयी संघात दिशा बागूल, प्राची चव्हाण, सिद्धी चौधरी, अभिरुची ठाकरे, भूमी गोसावी, अर्पिता बर्वे, ऋचिता नांद्रे आदींचा समावेश होता. स्पर्धेचे आयोजन व संयोजन क्रीडा शिक्षक भिकु त्रिवेदी व जगदिश वंजारी यांनी केले. पंच म्हणून किशोर रौंदळ व नरेश शाह यांनी काम पाहिले. समालोचन हेमंत पाटील, चंद्रेश राणा, जावेद धोबी, सुनिल शाह, वैभव पाटील, डी.बी.पाटील यांनी केले. तर स्कोरर म्हणून शिवाजी माळी व प्रशांत कासार यांनी काम पाहीले. स्पर्धा यशस्वीतेसाठी सुनिल राणा, सीमा पाटील, कैलास वळवी, नरेंद्र सुर्यवंशी आदी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.