Home बुलडाणा राजस्थान मधील तरुणासोबत विवाहितेचे पलायन

राजस्थान मधील तरुणासोबत विवाहितेचे पलायन

41
0

पतीची पोलीस स्टेशनला तक्रार

रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा – गावामध्ये चादर विक्री करणाऱ्या राजस्थान मधील नाशिर या तरुणासोबत विवाहितेने आपली दोन्ही मुले शाळेत गेले आहे.या संधीचा फायदा घेवून पलायन केले . अशी तक्रार विवाहितेच्या पतीने पोलीस स्टेशनला दाखल केली .ही घटना सरंबा येथे ७ मार्च रोजी सकाळी घडली .
सदर तक्रारी मध्ये शेख अनिस शेख रशीद यांनी नमूद केले की, सरंबा येथे मी व माझी पत्नी परवीनबी मुलाबाळासह गावात मोलमजुरी करुण उदरनिर्वाह चालवितो. मात्र गावामध्ये राजस्थान मधील एक नाशिर नावाचा युवक उधारीवर चादर विक्रीचा व्यवसाय करीत असे . नेहमी प्रमाणे मोलमजुरी करण्यासाठी शेतात गेलो आणि दुपारी घरी आलो असता घरामध्ये पलंगावर चादर विक्री करणारा नाशिर व पत्नी शेजारी बसलेले होते. यावरून पत्नीला विचारले असता सांगितले की तो पाणी पिण्यासाठी आला होता तेव्हा त्याला पुन्हा घरी येवू नको असे सांगितले होते.दुसऱ्या दिवशी गहू सोगण्यासाठी शेतात गेलो . आणि शेतात काम करीत असतांना घरून आईचा फोन आला की तुझी पत्नी परविनाबी ही सकाळपासून कुठे गेली माहीत नाही घरी परत आली नाही तू लवकर घरी ये असा फोन येताच भावासोबत घरी आलो तेव्हा दोन्ही मुले नुकतेच शाळेतून घरी आले होते . मुलांनाही काहीही माहीत नव्हते ,घरातील कपाट उघडून पाहिले अडता कपाटातील दागिने व ९२००० हजार रुपये आढळून आले नाही.आणि पत्नीचा शोध शेजारी व नातेवाईकांकडे घेतला असता मात्र कुठेही मिळून आली नाही. आणि सकाळी राजस्थान मधील चादर विक्री करणारा नाशिर गावात आला होता . त्यामुळे पत्नी परविनाबी ही त्याच्यासोबत निघून गेली आहे . अशी तक्रार शेख अनिस शेख रशीद यांनी अंढेरा पोलीस स्टेशनला दाखल केली . अशा तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी हरविल्याची नोंद घेतली.

Unlimited Reseller Hosting