Home पश्चिम महाराष्ट्र लहान बालकांना पळवून नेणारी तृतीयपंथीयांची टोळी पोलिसांनी पकळली

लहान बालकांना पळवून नेणारी तृतीयपंथीयांची टोळी पोलिसांनी पकळली

161

अमीन शाह

महाबळेश्वर – अंगणात खेळत असणाऱ्या मुलांना मारहाण करून पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या तीन तृतीयपंथीयांना महाबळेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.हे तिघेही मुंबई चे राहणार असून, त्यांनी आणखी किती मुलांना पळविले याचा कसून तपास पोलीस करत आहेत.
महाबळेश्वर येथील बौद्ध वस्तीत दुपारी सव्वा बाराच्या सुमारास हा प्रकार घडला असून ७ ते १० वयोगटातील काही मुले खेळत होती. त्यावेळी लक्ष्मण शंकर क्ल्लेमोर (वय ५०), बसुराज सायप्पा कडमिची (वय २५), आणि रमेश सिद्धराम टेकूल (वय २८) या तिघांनी मुलांना मारहाण करून पळवून नेण्याच्या तयारीत असता. अचानक सुरु झालेल्या मारहाणीमुळे हा लहान मुलांनी मोठ्याने आरडा ओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी सतर्कता दाखवून या तिघांच्या तावडीतून मुलांची सुटका केली. या प्रकरणामुळे घाबरलेल्या मुलांच्या पालकांनी व स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलीस स्टेशन मध्ये धाव घेतली. पालक व स्थानिक नागरिकांनी केलेल्या गर्दीमुळे घटना स्थळी धाव घेऊन तिघा तृतीयपंथीयांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
हे तिन्ही तृतीयपंथी मूळचे सोलापूरच्या यल्लमा पेठेतील रहिवासी असून,सध्या ते चेंबूर येथील छेडा नगर परिसरात राहतात. तिघांन विरोधात भादंवि कलम ३६३,३२३,५११,३४ अन्वये गुन्हे दाखल केले असून,त्यांनी अजून किती मुलांना पळवून नेलं ? याची चौकशी महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बंडोपंत कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली म.पो.ना सुरेखा चव्हाण करीत आहेत.महाबळेश्वर हे पर्यटन ठिकाण आहे या ठिकाणी हजारो पर्यटक येत असतात अशावेळी तृतीयपंथांना मज्जाव करावा मागणी स्थनिक नागरिकांतून करण्यात येत आहे.