Home रायगड शिरसे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

शिरसे ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

16
0

कर्जत – जयेश जाधव

तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीच्या वतीने ८मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला तर यानिमित्ताने राधामाई मंगल कार्यालयाच्या सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा महिला संघटक रेखाताई ठाकरे,कर्जत पंचायत समिती सभापती सुजाता मनवे, राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठमाबाई पवार,उद्योजिका करुणा भोईर, कृपा भोईर,इन्हर्वेड क्लबच्या अध्यक्षा सुलोचना गायकवाड ,बीड ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रभावती लोभी, पोलिस पाटील नयना भोईर,माजी सरपंच रतन वाघमारे,कर्जत- खालापूर विधानसभा संघटक संतोषशेठ भोईर, डॉ. येवले मॅडम, श्रीमती गडणवीस , माजी नगरसेविका यमुना विचारे आदी उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत शिरसे ग्रामपंचायतीच्या सरपंच आरती भोईर यांनी केले.त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी उपस्थित शिरसे ग्रामपंचायतीच्या परिसरातील कर्तुत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला.तसेच ग्रुप ग्रामपंचायत शिरसे महिला बचतगट व महिला मंडळ यांच्या मार्फत विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री स्टाॅल उभारण्यात आले. यावेळी उपस्थित महिला भगिनींना प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना महिला जिल्हा संघटक रेखाताई ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले महिला संघर्ष करुन सर्वच क्षेत्रात पुढे जात आहे व पुढे येत असून नेतृत्त्वावर महिलांचे क्षेत्र अवलंबून असते.मात्र प्रयत्नांना महिलांनी कुठेही कमी पडू नका असा सल्ला त्यांनी दिला.पुरूष देखील समजदार असून महिलांना सहकार्य करीत आहेत.महिला लघुउद्योगांपासून बचत उद्योगापर्यत पोहचली असून ती कुटुंबाला आर्थिक हातभार लावत असते.तर संतोषशेठ भोईर यांनी सांगितले की महिलांना ५० टक्के आरक्षण आहे स्वकृर्तुत्वार सामोरे जात असताना स्व: ताच्या हिंमतीवर व ताकदीने कसे राहायचे याचे उत्तम ज्ञान महिलांना आहे.महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहे . माझ्या सौभाग्यवतीच्या जीवावर मी उभा आहे. ती माझ्या उद्योगात लिखाणाचे काम करीत असताना मला व्यवसायात मदत होते प्रपंचामध्ये पतीने आपल्या पत्नीला मदत केली पाहिजे त्यामुळे आर्थिक उन्नती होऊ शकते.महिलांना रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध होईल?? लघुउद्योग सुरू करताना बाजारभाव कसा मिळेल?? याबाबत व्यावसायिक मार्गदर्शन केले पाहिजे असे परखड मत त्यांनी मांडले व महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या ठमाबाई पवार यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा पाया रोवला.झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर यांची असंख्य उदाहरणे दिली.आजही महिला उच्च शिक्षण घेऊन जिल्हाधिकारी, पोलिस, सरपंच, डॉक्टर पदावर काम करीत आहे.मला दिल्लीत एक लाखांचा पुरस्कार मिळाला परंतु या पुरस्कारापेक्षा एक लाख महिला काम करतील तेव्हा मला आनंद वाटेल, महिलांनी नेहमीच पुढे जायला पाहिजे, महिलांनी भेडसावणाऱ्या समस्या मांडल्या पाहिजेत,असेही सांगितले.
सदरच्या कार्यक्रमात सहभागी महिलांसाठी होम मिनिस्टर (खास आकर्षण पैठणी) स्पर्धा घेण्यात आला.यामधे मंगळा संतोष भोईर विजेती ठरली असून तीला पैठणी देण्यात आली तर तेजश्री पंकज देशमुख (सांगिक खेळ) हिला भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उद्योजक संदिप भोईर, सरपंच आरती भोईर, उपसरपंच रविंद्र भोईर, सदस्य महेंद्र भोईर,दत्ता वाघमारे,शैला गुरव,मंजुळा डांगरे,शोभा पवार,गिता देशमुख,अर्चना वांजळे,कल्पना गायकवाड ,ग्रामसेविका सिमा राठोड यांनी परिश्रम घेतले.