Home विदर्भ महसूल विभागाने केला अवैध मुरुमाचा टिप्पर जप्त…!

महसूल विभागाने केला अवैध मुरुमाचा टिप्पर जप्त…!

56
0

देवानंद खिरकर

अकोट , दि. ०८ :- तालुक्यातील पोपटखेड परिसरातुन अवैधरित्या मुरुम व गौणखनीजाची सर्रास वाहतुक सुरु असून पोपटखेड धरणाला धोका निर्माण झाला आहे.याची दखल घेत महसूल विभाग अकोट यांनी अवैध वाहतुक करणारा एक मुरुमाचा ट्रक पकडला.

सदर ट्रक पकडून जप्त करुन ग्रामीण पोलिस स्टेशन अकोटला लावण्यात आला आहे.पोपटखेड परिसर हा सातपुड्याच्या पायथ्याशी येतो.या भागात मोठ्या प्रमाणात गिट्टि खदानी असुन ,रेती व मुरुम सुध्दा मुबलक आहे.गेल्या कित्येक दिवसापासुन काही माफिया या भागातून अवैध रित्या मुरुम आनून विक्री करीत आहेत.विशेष म्हणजे मागिल बाजुने व वनविभागाच्या बफ़र झोनमधुन मजुरांच्या सहकार्याने खोदकाम करुन मोठ्या प्रमाणात मुरुमाची अवैध रित्या वाहतुक सुरु आहे.खोदकामामुळे पोपटखेड धरणाला धोका निर्माण झाला आहे.त्यावर महसूल विभाग अकोटचे मंडळ अधिकारी व तलाठी यांनी अवैध मुरुमाने भरलेला ट्रक अकोटकडे येत असलेला टीप्पर क्रमांक एम एच 04 डी डी 5349 हा ट्रक पकडून जप्त केला आहे.सदर टीप्परमधे 3 ब्रास मुरुम आढळुन आला असुन टीप्पर ग्रामीण पोलिस स्टेशनला लावण्यात आला आहे.सदर कारवाई मंडळ अधिकारी सायरे,काळे,महिला तलाठी मेघा पाटील यांनी केली आहे.