महत्वाची बातमी

अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जानुन घेण्यासाठी भंडारा येथे राईस मिलला भेट

नांदेड , दि. ५ ; ( राजेश भांगे ) :-
अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भंडारा येथील धान खरेदी केंद्र व राईस मिलला भेट देऊन धान उत्पादक शेतकरी व मिलरच्या समस्या जाणून घेतल्या. धान खरेदी केंद्रावर येणारे सर्व धान खरेदी केले जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिले.

आज खराबी आणि सौंदड येथील राईस मिलला छगन भुजबळ यांनी भेट देऊन मिलींगची पाहणी केली.यावेळी उपस्थित शेतकरी आणि मिलर यांनी श्री.भुजबळ यांना धान शेती आणि राईस मिलिंगबाबत माहिती दिली.यावेळी आ राजू कारेमोरे आणि आ मनोहर चंद्रिकापुरे यांच्यासह पुरवठा उपायुक्त रमेश आडे, जिल्हा पुरवठा अधिकारी बनसोड, जिल्हा पणन अधिकारी खाडे यावेळी उपस्थित होते.
यावेळी भुजबळ म्हणाले की, सर्वसाधारण धानाला १८१५ रुपये आणि उच्चप्रतीच्या धानाला १८३५ रुपये दर होता. गेल्या कित्येक वर्षापासून धान उत्पादक शेतकऱ्यांची बोनसची आणि दरवाढीची मागणी होती. महाविकास आघाडी सरकारने धानाला ५०० रुपये बोनस जाहीर केला. त्या पाठोपाठ नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात आणखी २०० रुपयांची दरवाढ देण्यात आली. त्यामुळे धानाचे भाव जवळपास २५३५ रुपयांच्या घरात पोहचले आहे. याचा धान उप्तादक शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूर आदी जिल्ह्यांमधील धान उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मी भंडारा येथे ही प्रातिनिधिक भेट दिल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले.
त्याचप्रमाणे धान वाहतुकीची परवानगी ५०० किलोमीटर वरून ८०० किलोमीटर करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. कोकण विभाग सोडून राज्यातील संपूर्ण जिल्ह्यांचा वाहतुकीमध्ये समावेश करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले.
शिवभोजन केंद्रास भेट
मंत्री छगन भुजबळ यांनी भंडारा महसूल कॅन्टीन येथील शिवभोजन केंद्रास भेट दिली व पाहणी केली. शिवभोजनाचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. शिवभोजन योजनेच्या जेवणाचा दर्जा उत्तम असल्याची प्रतिक्रिया यावेळी लाभार्थ्यांनी व्यक्त केली. स्वच्छता राखा, फलक दर्शनी भागात लावा, जेवणाचा दर्जा उत्तम ठेवा अशा सूचना भुजबळ यांनी केल्या. शिवभोजनामुळे गरजू व गरीब जनता समाधानी असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.

You may also like

महत्वाची बातमी

मक्का शरीफ मे आज जोरदार बारीश हुई हो रही इस बारीश का बहेतरिन विडिओ हमे मक्का शरीफ से प्राप्त हुवा है 

पवित्र मक्का शरीफ मे आज जोरदार बारीश हुई हो रही इस बारीश का बहेतरिन विडिओ ...
महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...