Home पश्चिम महाराष्ट्र रुग्ण हक्क परिषद काळाची गरज आहे – लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर

रुग्ण हक्क परिषद काळाची गरज आहे – लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर

442

नांदेड , दि.५ ; ( राजेश भांगे ) –
पुणे आजकाल जाती – धर्मात भांडणं, स्त्रियांवरील अन्याय अत्याचार याशिवाय पेपरला काहीही छापून येत नाही.

परंतु कोणाचीही जात-पात न बघता माणूस म्हणून प्रत्येकाला जगवण्यासाठी काम करणारी पेशंटला मदत करणारी – हक्क मिळवून देणाऱ्या रुग्ण हक्क परिषदेचे काम प्रेरणादायी असल्याचे मत प्रसिद्ध गायक – नृत्यांगना लावणीसाम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी रुग्ण हक्क परिषदेच्या केंद्रीय प्रधान कार्यालयात व्यक्त केले. रुग्ण हक्क परिषदेच्या कार्यालयात त्यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांनी विविध विषय आणि आठवणींना उजाळा दिला. रंगमंचावरील कलाकार, पडद्यामागील कलाकार, मेकअप कलाकार, साउंड – लाईट, नेपथ्य आणि वादकसहित सर्वांचे वृद्धपकाळात अत्यंत हाल होतात. दवाखाण्याला – ऑपरेशनला पैसे नसतात. अश्यावेळी रुग्ण हक्क परिषद मदतीला येईल अशी अपेक्षा त्यांनी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्याकडे बोलून दाखविली.
यावेळी परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी रुग्ण हक्क परिषद कार्य आणि भूमिका हे पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यालय सचिव दीपक पवार, जिल्हाअध्यक्ष तेजश्री पवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
परिषद सर्व कलाकारांना नेहमीच वैद्यकीय मदत करीत आहे, यापुढेही नक्कीच मदत करेन प्रसंगी रस्त्यावर उतरून कलाकारांसाठी आंदोलन करू असेही अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.