Home विदर्भ भव्य जनजागरण मेळावा संपन्न…!!

भव्य जनजागरण मेळावा संपन्न…!!

138

कोरपना – मनोज गोरे

चंद्रपुर , दि. ०३ :- दि.०२ मार्च २०२० सोमवार रोजी मौजा गोवारीगुडा (माणिकगड माईन्स रोड) श्री दत्त मंदिर येथे आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल व जिल्हा पोलिस प्रशासन चंद्रपूर तथा पोलिस स्टेशन गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य जनजागरण मेळावा व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात राजुरा, कोरपना, जिवती ही तीन्ही तालुके येत असून ह्या तिन्हीही तालुक्यातील बरेचसा भाग हा अति दुर्गम व डोंगराळ भागात येतो. या भागात जास्तीत जास्त आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्याला येत असून हा भाग नक्षल प्रभावित असल्याचे ओळखले जाते. शिवाय त्यांना आरोग्याची, शिक्षणाची, कायद्याची आणि शासनाच्या विविध योजनांची माहितीचा अभाव असल्यामुळे येथील समाज अती मागासलेला आहे. पोलिस प्रशासनाविषयी आणि नक्षल विषयी भीतीचे वातावरण यासमजात पसरलेले असल्यामुळे हा समाज अप्रगत आहे. त्यामुळे संपूर्ण जनतेत जाणीव जागृती करून त्यांना आरोग्याची, शिक्षणाची, कायद्याचे ज्ञान, शासनाचे विविध योजनांची माहिती देऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करून जनतेत आणि पोलिस प्रशासनविषयी एकोपा निर्माण व्हावा म्हणून गडचांदूर पोलिस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती सर, उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार सर आणि सरपंच यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
बाल सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण वातावरण आनंदीमय झाले होते. शिबिरात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मेळाव्याच्या माध्यमातून नागरिकांनी आरोग्य शिबिराचे लाभ घेतला. शासनाचे विविध योजनांची माहिती संबंधित विभागाच्या पथकाने लावण्यात आलेल्या स्टॉल मधून देण्यात आली. सदर कार्यक्रमात गावातील सर्व बालके महिला व पुरुष मंडळीने आपली उपस्थिती दर्शविली. एकात्मिक महिला व बाल कल्याण विभाग, महसूल व जिल्हा पोलिस प्रशासन विभागाचे आणि आरोग्य विभागाचे भरभरून कौतुक करण्यात आले.