Home उत्तर महाराष्ट्र पोलीस उपनिरक्षकास 40 हजाराची लाच घेताना अटक

पोलीस उपनिरक्षकास 40 हजाराची लाच घेताना अटक

30
0

सर्वञ उडाली खळबळ

विनोद पत्रे

धुळे , दि. ०३ :- तक्रार अर्जावर कारवाई करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच घेताना एसीबीने पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले. दुपारी ही कारवाई करण्यात आली आहे. यामुळे धुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सचिन प्रभाकर गायकवाड़ (वय 36,) असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
सचिन गायकवाड हे धुळे जिल्ह्यातील मोहाडी पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. दरम्यान, यातील 60 वर्षीय तक्रारदार ठाणे जिल्ह्यातील आहेत. मुळचे धुळे येथील आहेत. त्यांचे धुळ्यातील घर एका व्यक्तीने बनावट स्वाक्षर्‍याकरून बळकावल्याबाबत अर्ज पोलीस ठाण्यात दिला होता. या अर्जाची चौकशी सचिन गायकवाड हे करत होते. त्यावेळी या अर्जावर चौकशीकरून कारवाई करण्यासाठी सचिन यांनी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी धुळे एसीबीकडे तक्रार केली होती. त्यानुसार, याबाबत चौकशी करण्यात आली. त्यात लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी दुपारी सचिन यांना तडजोडी अंती तक्रारदार यांच्याकडून 40 हजार रुपयांची लाच घेतना रंगेहात पकडण्यात आले.
नाशिक विभागाचे पोलीस अधीक्षक सुनिल कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सतीश भामरे व त्यांच्या पथकातील सुकदेव मुरकुटे, सुनील गीते, मनोज पाटिल यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Unlimited Reseller Hosting