Home मराठवाडा दिव्यांग पाल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उददेशाने त्यांच्या पालकांच्या एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन यशस्वी

दिव्यांग पाल्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उददेशाने त्यांच्या पालकांच्या एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन यशस्वी

11
0

गट साधन केंद्र बदनापूर येथे अनेकांची उपस्तिथी..

सय्यद नजाकत – बदनापूर

जालना , दि. ०३ :- (प्रतिनिधी): दिव्यांग पाल्यांना प्रवाहात आणण्याच्या उददेशाने त्यांच्या पालकांच्या एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन गट साधन केंद्र बदनापूर येथे करण्यात आले. या प्रशिक्षणात दिव्यांगाच्या पालकांना मार्गदर्शन करण्यात येऊन सोयी-सुविधाबाबत माहिती देण्यात आली.

समग्र शिक्षा जिल्हा परिषद जालना व जिल्हा शैक्षणिक प्रशिक्षण संस्था जालना यांच्या संयुक्त विद्यमाने हे एकदिवसीय पालक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित पालकांना समावेशित शिक्षण विभागाबाबत माहिती देण्यात येऊन पालकांच्या समस्यांही जाणून घेऊन त्या कशा दूर करता येईल यावर चर्चा करण्यात आली. तसेच दिव्यांग बालकांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा, साहित्य, शैक्षणिक सहाय्य या बाबत जागृती करण्यात आली. कार्यक्रमास अधिव्याख्यात्या सुनिता राठोड या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. गट समन्वयक बाबासाहेब जुंबड हे या वेळी अध्यक्षस्थानी होती. यावेळी बोलताना जुंबड यांनी दिव्यांग बालकांच्या शैक्षणिक विकासात पालकांची काय भूमिका आहे या बाबत सविस्तर मार्गदर्शन करून या बालकांना जीवनाच्या प्रवाहात आणण्याच्या दृष्टीने शासन देत असलेल्या सोयी व मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास कार्यालयातील सर्व कर्मचारी, विशेष तज्ञ, विशेष् शिक्षक व मोठया संख्येने पालक उपस्थित होते. या प्रशिक्षण सत्रात सर्व पालकांना चहा-नाष्टा, जेवण व हस्तपुस्तिका देऊन दिव्यांग बालकांबाबत मार्गदर्शन करण्यात आल्यामुळे पालकांतही आनंदाचे वातावरण होते.