Home विदर्भ अकोट तालुक्यातील २२ युवकांना सैन्य दलात देशसेवेची संधी…!!

अकोट तालुक्यातील २२ युवकांना सैन्य दलात देशसेवेची संधी…!!

52
0

अखंड प्रहरी होऊन सिमांचे करणार रक्षण

देवानंद खिरकर – अकोट

अकोला , दि. ०३ :- भारतीय सैन्यात भर्ती होऊन देशसेवेची सुवर्णसंधी लाभण्याचं भाग्य मोजक्या नागरिकांना लाभतं.अकोट तालुक्यातून १२ ते २३ आँक्टोबर दरम्यान तब्बल २२ देशप्रेमी युवकांना ही संधी चंद्रपूर येथे भर्ती प्रक्रियेत लाभली.हे युवक पात्रता परिक्षा व संपूर्ण प्रक्रियेत उतीर्ण झाल्याचा निकाल गत ११ फेब्रुवारीला जाहिर झाल्याचे समजते.आता हे युवक देशसेवेसाठी सज्ज झाले असून लवकरच अखंड प्रहरी होऊन सिमांचे रक्षण करणार आहेत.

शुभम वानखडे,राहूल गवई,रविकांत कोल्हे,उज्वल आवारे,पवन अहीर,विशाल रेखाते,गौरव मिसाळ,रोशन घनबहाद्दूर,आदित्य अंबळकार,धनंजय कोगदे,पंकज पुंडकर,कोल्हे,महेश आगरकर,आकाश धांडे,विशाल धुळे,नावेद शहा,शेखर वाडीभसे,हरिश मंगळे,संकेत आवारे,आदर्श मोहोड,विवेक डोहाळे,करण बंकुवाले आदी भारतीय सैन्यात प्रवेश झालेल्या युवकांची नावे आहेत.यातील अनेक युवक खारपाणपट्यातील रहिवासी आहेत.ही भर्ती नागपूर येथील आर्मी भर्ती कार्यालयांतर्गत चंद्रपूरला एका स्टेडियमवर पार पडली होती.या भर्ती प्रक्रियेतअकोला,अमरावती,गडचिरोली,भंडारा व चंद्रपूर येथील युवक सहभागी झाले होते.या युवकांचे तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.लवकरच या नवसैनिकांची २९ फेब्रुवारीला शहराच्या मुख्य मार्गावरुन वाजत-गाजत व ढोल-ताश्यांच्या गजरात फेरी काढण्यात आली.त्यांचा शहरातील लक्षवेध बहुउद्देशिय संस्था व टार्गेट अकँदमी तर्फे श्री कैलास वर्मा यांनी सत्कार केला,
श्री कैलास वर्मा सर गत १४ वर्षांपासून दुष्काळ ग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण देत असून आजवर शेकडो विद्यार्थी त्यांचा अकादमीतून देशसेवेसाठी रुजू झाले आहेत