महत्वाची बातमी

ग्रा.प.चे’ आपले सरकार केंद्र ‘बंद , मात्र लाखो रुपयांची केली वसुली

Advertisements

सरपंच दिपक केदार यांनी आणला प्रकार उघडकीस..

रवि आण्णा जाधव

देऊळगाव राजा , दि. ०३ :- ग्रामीण भागातील प्रत्येक ग्रा.प. कार्यालयामध्ये शासनाने जनतेच्या हितासाठी ऑनलाइन कागदपत्रे मिळण्याची योजना आपले सरकार केंद्र या माध्यमातून ग्रा.प. मध्ये,सुरू केली . मात्र इकडे गुंजाळा येथील आपले सरकार केंद्र कायमचे बंद अवस्थेत असतांना सुध्दा चक्क कागदोपत्री दाखवून ग्रा.प.कडून मात्र सक्तीने लाखो रूपायांची वसुली केल्या जात आहे.असा प्रकार सरपंच दिपक केदार यांनी उघडकीस आला आहे.
शासनाने ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेची कामे आपआपल्या गावातच ऑनलाईन मिळावे यासाठी ग्रामीण भागातील गावागावात ग्रा.प.कार्यालयात आपले सरकार केंद्र ,सुरू केले . आणि ऑनलाइन कामाला गती दिली मात्र इकडे तालुक्यात शेवटच्या टोकावर दीड ते दोन हजार लोकसंख्या असलेले गुंजाळा हे गाव हे विविध शासनाच्या लाभापासून कोसो दूर आहे. याच संधीचा गैरफायदा घेवून आपले सरकार केंद्र चालविणाऱ्या तालुका समन्वय यांनी गुंजाळा येथील आपले सरकार केंद्र अधिकारी वर्गांच्या आशीर्वादाने कागदोपत्रीच चालविले आहे. त्यामुळे गावकऱ्यांना ग्रा.प.कडून लागणाऱ्या कागडपत्रासाठी बाहेरगावी जावून आर्थिक भुर्दंड सहन करीत तालुक्याला हेलपाटे मारावे लागत आहे . इकडे हे आपले सरकार केंद्र बंद अवस्थेत असलेल्याने कार्यालयात एका कोपऱ्यात धूळ खात पडून आहे.त्यामुळे गावकऱ्यांना अत्यावश्यक लागणारे रहिवाशी दाखला,आठ अ, जन्म मृत्यू दाखले,घोषणापत्र ,घराच्या नोंदी ,आदी कागदपत्रासाठी तालुक्याला अथवा मेरा बु येथे हेलपाटे मारावे लागत असून फार आर्थिक भुर्दंड सहन करीत त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

You may also like

महत्वाची बातमी

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने कोर्टात ताबडतोब पुनर्विचार याचिका दाखल करावी

  रावेर (शरीफ शेख) रॅगिंग विरोधी समितीच्या शिफारशी नुसार संबंधित आरोपींवर निलंबनाची कारवाई न करणाऱ्या ...
महत्वाची बातमी

जिल्हा उपनिबंधक श्री कुंदन भोळे यांनी तात्काळ घेतली “पत्रकार संरक्षण समिती” च्या तक्रारीची दखल

सोलापूर  – सोलापूर येथील सोलापूर सिध्देश्वर बँकेच्या मुख्य वसुली अधिकारीने दै . अब तक सोलापूरचे ...