Home मुंबई अर्थसंकल्प अधिवेशनात अक्कलकोटचे आ.सचिन कल्याणशट्टी यांनी सरकारला धरले धारेवर

अर्थसंकल्प अधिवेशनात अक्कलकोटचे आ.सचिन कल्याणशट्टी यांनी सरकारला धरले धारेवर

84
0

वागदरी – नागप्पा आष्टगी

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनात विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्यांणशेट्टी यांनी शेतकरी कर्ज माफी , पीक कर्ज, महिला सुरक्षा या प्रश्नावर सरकारला चांगलेच धारेवर धरले.
या प्रस्तावावर चर्चा करताना आमदार कल्याणशेट्टी यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची मर्यादा दोन लाख न ठेवता सरसकट कर्जमाफी करावी,शेतकऱ्यांना पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून घ्यावे, ज्या बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत ,अश्या बँकांनी पीक कर्ज देण्याचे निर्देश सरकारने द्यावे,राज्यात महिला अत्याचारात वाढ होत आहे, तेव्हा अशा नराधमांविरुद्ध कडक कारवाई करावी, महिलांना
शालेय स्तरापासूनच स्वयंरक्षणाचे धडे देण्याची गरज आहे,तश्या प्रकारच्या तरतुदी शालेय शिक्षणात करण्याची शिफारस ही आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी केली.

या वेळी बोलताना आ.कल्याणशट्टी पुढे म्हणाले की ,काँग्रेस ,राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघडी सत्तेवर येताना अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतक-यांना एकरी २५ हजार रू.नकसान भरपाई देण्याचे आश्वसन दिले होते ते पूर्ण करू शकले नाहीत विना अट कर्जमाफी देण्याचे आश्वासन पाळले नाही.त्यात ही अट आहेत.त्या मुळे हे सरकार बोले तैसे चालत नसल्याचे स्पष्ट केले.महाराष्ट्र सरकारच्या पहिल्याच अधिवेशनात आ.कल्याणशट्टी यांनी तालुक्यातील विविध समस्यावर प्रकाश टाकुन अनुदानाची मागणी केली होती.तालुक्यातील समस्या व शेतक-यांचे प्रश्न निभ्रिडपणे मांडल्या बध्दल तालुक्यातील जनतेमधुन समाधन व्यक्त केले जात आहे.