Home विदर्भ कावली येथे पहिल्यांदाच गावाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.!

कावली येथे पहिल्यांदाच गावाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली.!

158

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – नजीकच्या अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील कावली येथील तितरे दांपत्य १९ फेब्रुवारी २०२० रोजी झालेल्या अपघातात जागीच ठार झाले होते. त्यामुळे कावली गावात व गावाच्या पंचक्रोशीत शोककळा पसरली होती.त्यांचा सामुहिक श्रद्धांजली चा कार्यक्रम अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या तत्वप्रणालीनुसार घेण्यात आला.

यामद्ये सर्वप्रथम समाजप्रबोधन भजने , ग्रामगीता या ग्रंथातील अंत्यसंस्कार या अध्यायाचे सामुहिक वाचन,प्रमुख उपस्थित पाहुणे मंडळींच्या माद्यमातून शब्दसुमानांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्री हरिभाऊ वाळके व प्रमुख उपस्थिती म्हणुन श्री रमेश वाळके,श्री विठ्ठल राळेकर,प्रभाकर वाघे,श्री माणिक पोस्ती,श्री नितीन टाले आदींनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली .
या श्रद्धांजली कार्यक्रमाचे संचालन प्रा.निलेश मोहकार तर प्रास्ताविक श्री लक्ष्मणराव मानकर यांनी केले.या सामूहिक श्रद्धांजली कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे तालुक्यातील सामाजिक , राजकीय क्षेत्रातील गनमान्य मंडळी,आप्त मंडळी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित राहून तितरे दाम्पत्यांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण केली.सरतेशेवटी राष्ट्रवंदनेने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.