Home जळगाव शेतकऱ्यांचा शेतातुन चोरी मालाची रेल्वेने अवैध वाहतुक थांबवा – खासदार सुप्रिया...

शेतकऱ्यांचा शेतातुन चोरी मालाची रेल्वेने अवैध वाहतुक थांबवा – खासदार सुप्रिया सुळेंकडे मागणी

135

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यासह रावेर तालुक्यात रेल्वेने शेतकऱ्यांच्या शेतातुन चोरीचा भाजीपाला,केळी, कडुनिंबाचा पाला अवैध वाहतूक होते ती थांबवणेची मागणी सोपान पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा यांनी खासदार यांचेकडे केली
जळगाव जिल्ह्यासह रावेर,यावल, मुक्ताईनगर,चोपडा,तालुक्यांसह विदर्भ,मध्यप्रदेशातुन भुसावळ विभागातील मध्य रेल्वेच्या अनेक गाड्या मुंबई कडे जाणारर्या अमृतसर कुशीनगर यागाड्यासह विदर्भातील काही एक्सप्रेस गाड्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला केळी कडुनिंबाचा पाला चोरटे चोरुन रेल्वेने मुंबई पर्यंत विना तिकीट विना पार्सल मुंबई पर्यंत फुकट नेत असतात रेल्वेत संडासात व जांइटमध्य आणी सिटखाली जबरदस्तीने वाहतूक करीत आसतात अनेक वेळा प्रवाशात व त्यांच्यात वाद होत असतो.आरक्षीत डब्यात टी सी व आर पी एफ सुद्धा प्रवाशांना न्याय देत नसतात. कारण टी सी व आर पी एफ डागाप्रमाने अनआथराईज पैसे त्यांच्या कडुन वसुल करीत आसतात.एकव्याक्ती
तिनं ते चार डाग नेत असतो. साधारण एक हजार रुपये पर्यंत त्याची विक्री होत असते.त्यात रेल्वेचे आर पी एफ टीसी यांना दोन-तीनशे रुपयाची वाटप होत असते.हा गोरखधंदा अनेक वर्षांपासून राजरोस सुरू आहे. शेतकरी शेतात असताना त्यांची चोरी पकडली गेली तर शेतकऱ्यांना हे लोक दमदाटी करत असतात.अनेक वेळा तर विनयभंग किंवा जातीवाचक गुन्ह्याच्या तक्ररीची धमकी देत असतात.या व्यायसायात महीला वर्ग असल्याने अनैतिक संबंधात वाढ होत आहे या अनैतिक संबंधातून रावेर तालुक्यातील के-हाळे येथील दोन महीला भाजीपाला तोडण्यासाठी गेलेल्या असताना त्यांचा खुन झाला होता त्यातील आरोपी अटकेत आहे. तसेच या परीसरात कडुनिंबाची कोवळी पाने पाला टनोगणती तोंडुन नेत आसल्याने या परीसरात उपयोगी असलेले कडुनिंबाची झाडे उध्वस्त व नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.त्यामुळे या परीसरात पर्यावरणात बदल होत असुन पाऊस ही पडण्याचे प्रमाण कमी झाले आहे.तसेच तपमानात ही सततची वाढ होत आहे.
त्यासाठी महोदय वरील सर्व बाबींचा गांभीर्याने विचार व्हावा आपल्या सहकार्याची अपेक्षा शेतकरी वर्गातुन होत आहे आपण हा विषयास प्रधान्य देऊन रेल्वेने होणारी अवैध वाहतूक थांबवुन कठोर दडांत्मक कार्यवाहीची मागणी रेल्वे मंत्र्यांकडे करावी ही विनंती.शेतकऱ्यांना कायमचा न्याय द्यावा ही नम्र विनंती.
जिल्हाध्यक्ष किसान सभा सोपान पाटील यांच्या सह कार्यालयीन सचिव संजय चव्हाण प्रदीप भोळे चंदुभाऊ चौधरी राजु भाऊ सह अनेकांच्या स्वाक्षरी आहे सुप्रिया ताई सुळे यांना किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील
वरील मागणीचे निवेदन देताना माजी आमदार सतीश पाटील ,राजु भाऊ देशमुख, जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील जि प गटनेते शशीभाऊ साळुंखे रामधन पाटील इत्यादी हजर होते.