Home विदर्भ अन , त्याने आपल्या आजीला मारून टाकले , “सर्वत्र खळबळ”

अन , त्याने आपल्या आजीला मारून टाकले , “सर्वत्र खळबळ”

101
0

अमीन शाह

नागपूर , दि. ०३ :- दारुड्या नातवाने रागावल्याचा राग मनात धरून आजीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास घडली. राऊलाबाई रामदास गणवीर (70) रा. टीव्ही टॉवर जवळ, मानवता नगर झोपडपट्टी असे मृत आजीचे नाव आहे. तर लकी सुंदर गणवीर (20) असे आरोपी नातवाने नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, बहीण निकिता हिला आरोपी लकी नेहमी मारहाण करायचा. घटनेच्या दिवशीही त्याने बहिणीला मारहाण केली. नातनीला मारहाण होत असल्याचे पाहून आजी राऊलाबाई लकीवर रागावली. आजीने रागावल्याचा राग मनात धरून मध्यरात्री संतापाच्या भरात लकीने राऊलाबाईच्या डोक्यावर दगड हाणला. गंभीर जखमी झालेल्या राऊलाबाई घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना आज मंगळवारी सकाळी परिसरात माहिती होताच एकच खळबळ माजली. सूचना मिळताच गिट्टीखदान पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी आरोपी लकीला अटक केली आहे. घटनेच्या वेळी आरोपी लकी हा दारू पिऊन असल्याची माहितीही पुढे आली आहे.

Unlimited Reseller Hosting