Home मराठवाडा दहावी उत्तिर्ण होऊन नौकरी शोधनाय्रांसाठी आनंदाची बातमी

दहावी उत्तिर्ण होऊन नौकरी शोधनाय्रांसाठी आनंदाची बातमी

131
0

नांदेड , दि.२६ – ( राजेश भांगे ) –
Railway Recruitment २०२०/ नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. विशेष म्हणजे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी रेल्वेत नोकरी करण्याची मोठी संधी आहे. रेलवे भर्ती आयोगाने (आरआरसी) २७९२ अॅपरेंटिस जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून अर्ज मागवण्यात आले आहे.

आरआरसीनं जारी केलेल्या जाहिरातीनुसार, पाच मार्चपासून या पदांसाठी अर्ज दाखल करू शकता. अर्ज करण्याची अखेरची तारीख चार एप्रिल आहे. विशेष म्हणजे, अॅपरेंटिस पदांसाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार नाही. अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आठवी / दहावी आणि आयटीआयमध्ये आलेल्या गुणांनुसार निवड करण्यात येणार आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय १५ ते २४ वर्ष असावं.तसेच उमेदवार दहावीची परीक्षा उतीर्ण झालेला असावा. दहावी सोबतच उमेदवार आयटीआयची परीक्षाही पास झालेला असावं. उमेदवारानं या परीक्षा कमीत कमी ५० गुणांसह उतीर्ण केलेल्या असाव्यात. एससी,एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांना कोणतेही शुल्क नाही. जनरल आणि ओबीसी उमेदवारांना अर्जाचं शुल्क १०० रूपये असेल.

दरम्यान, केंद्र सरकारच्या आधिपत्याखाली येणारी सहा लाख ८३ हजार पदं रिक्त आहेत. सुत्रांच्या माहितीनुसार, ही पदं भरण्याचा विचार केंद्र सरकारकडून करण्यात येत आहे. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे. UPSC मार्फत ४३९९ आणि SSC मार्फत १३९९५ पदं केंद्र सरकार लवकरच भरणार आहे. मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच आरआरबी अंतर्गत १,१६,३९१ पदे भरली जाणार आहेत.

Previous articleखा.चिखलीकरांना लवकरच केंद्रात राज्यमंत्री केले जाऊ शकते  – रावसाहेब दानवे
Next articleसहायक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या आकस्मिक भेटीने कर्मचारी धास्तावले
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here