Home मराठवाडा खा.चिखलीकरांना लवकरच केंद्रात राज्यमंत्री केले जाऊ शकते  – रावसाहेब दानवे

खा.चिखलीकरांना लवकरच केंद्रात राज्यमंत्री केले जाऊ शकते  – रावसाहेब दानवे

71
0

नांदेड , दि. २६ :- ( राजेश भांगे ) –
नांदेड लोकसभा निवडनुकित धक्कादायक निकाल लागला आणि संपूर्ण राज्याचे लक्ष वेधुन घेतले.

“जायंट किल्लर “ठरलेल्या खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकरांना राज्याचे बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांना शह देण्यासाठी केंद्रात राज्यमंत्री पद दिले जाईल असे संकेत लोहा येथे झालेल्या कार्यक्रमात भाजप चे जेष्ठ नेते केंद्रिय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी बोलताना दिले.
प्रतापरावांनी जो ” *प्रताप*” केला त्यामुळे संपूर्ण राज्याचे व देशाचे लक्ष वेधुन घेतले असुन लोक त्यांच्या मागे उभे राहतात याचे सौदारण देत जिल्ह्यात इतर पक्ष्यांना शह देऊन भाजप पक्षाला बळकटि देण्यासाठी प्रताप पाटील यांच्या सारख्या धडाडिच्या व प्रभावी संघटक असलेल्या नेत्याला पाठबळ देण्याचा विचार पक्षपातळीवर सुरू आहे. नांदेड , हिंगोली, परभणी व लातुर अशा एकुण १६ मतदार संघा वर प्रभाव वाढविण्याच्या द्रष्टिने बांधणी सुरू असुन खासदार चिखलीकरांना अगामी काळात केंद्रीय राज्य मंत्री करण्या संदर्भात केंद्री राज्य मंत्री रावसाहेब दानवे पाटील व गेल्या च महिन्यात नांदेड येथे आले असता मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडविस यांनी सुद्धा केलेले (हेच) सुतोवाच्य महत्त्वाचे मानले जात आहे.

Unlimited Reseller Hosting