Home मराठवाडा ग्रामीण डाक सेवकांनी एकाच दिवशी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे २५५ खाते उघडून...

ग्रामीण डाक सेवकांनी एकाच दिवशी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे २५५ खाते उघडून केला महाराष्ट्रात विक्रम.

196

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

नांदेड , दि. २४ :- दि.२२ रोजी इस्लापुर परोटी येथील डाक कर्मचारी रवी वाडीकर यांनी मी एक डाक विभागाचा सेवक आहे मला काही डाक विभागाचे देने आहे. मी माझ्या डाक विभागाची सेवा करीत करीत ग्रामीण भागातील निराधार, अपंग, गावातील मोलमजुरी करणारे,शेतकरी, शेत मजूर गावातील जेष्ठ नागरिक ,बचत गटाच्या महिला,व नागरिकांना यांची सेवा करण्याचे ठरवले.

खेडे गावातील नागरिकांना बॅंकेचा व्यवहार करण्यासाठी इस्लापुर किंवा हिमायतनगर, किनवट आशा ठिकाणी जाऊन बॅंकेचा व्यवहार करावा लागतो. कधी कधी नेट नसतो तर दोन दोन दिवस बँकेला सुटी असते.तर ग्रामीण भागातील बऱ्याच महिला व पुरुषांना बँकेचे पैसे भरणे व काढणे यांचा फॉर्म भरता येत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना बॅंकेचा आर्थिक व्यवहार करता यावा यासाठी भारत सरकारने कोणतेही कागदपत्रे न घेता हाताच्या आगठ्यावर पोस्ट बँकेची सुरुवात केली.
शाखा डाकपाल परोटी यांनी दिनांक २२ रोजी गावातील नागरिकांना घरोघरी जाऊन माहिती दिली.एवढेच नाही तर पोस्ट बॅंकेचा व्यवहार कसा करावा पैसे कसे पाठवावे,पैसे कसे भररावे,पैसे कसे काढले जातात याची माहिती देऊन एकाच दिवशी एकट्याने २५५ इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडून नांदेड विभागात नाही तर महाराष्ट्रात त्यांनी विक्रम केला आहे.
डाक निरीक्षक किनवट आभिनव सिन्हा यांना याची माहिती मिळताच दिनांक २३ रोजी इस्लापुर येथे जाऊन शाखा डाकपाल रवी वाडीकर यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी नांदेडचे मार्केटिंग एक्सिकेटीव्ह सुरेश सिंगेवार व डाक कर्मचारी उपस्थित होते.
तर डाक अधीक्षक नांदेड यांनी रवी वाडीकर यांना फोन द्वारे अभिनंदन व शुभेच्या दिल्या आहेत. वाडीकर यांनी एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने पोस्ट बँकेचे खाते उघडल्याने सर्वत्र अभिनंदन होत आहे.