सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार
वर्धा , दि. २४ :- वाचन संस्कृती चळवळ, माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने दिनांक १९ फेब्रुवारी २०२० ला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बहाद्दरपूर (आंजी), तालुका देवळी जिल्हा वर्धा येथे पारधी वस्तीच्या मुलांच्या शिक्षणासाठी व अभ्यासासाठी “लोक शिक्षा केंद्राचे” उद्घाटन करण्यात आले.
माध्यम साक्षरता संस्थेचे संस्थापक विजय पचारे यांच्या हस्ते व उषाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व गजानन मंडाते यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. बहाद्दूरपूर ही पारधी वस्ती आंजी या ग्रामपंचायत च्या वार्डाचा भाग आहे. आंजी ते साथी या रोडवरून दोन अडीच किलोमीटरवर अंतरावर ही वस्ती आहे. आजही या वस्ती व पायदळ जावे लागते. अशा दुर्गम भागातील वस्तीवर माध्यम साक्षरता ग्रामीण विकास संस्थेची टिम आज जाऊन आली. पायदळ जातांना डोक्यावर दोनतीनशे पुस्तकाची थैली एक फळा व लेखन साहीत्य आणि ग्रामपंचायत मधील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा इत्यादी साहित्य घेऊन वस्तीवर गेली आणि लोकशिक्षा केंद्राचे उद्घाटन करून आली. उद्धेश एकच की, पारधी वस्तीच्या मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे. या साठी माध्यम साक्षारता संस्था, वाचन संस्कृती चळवळी च्या माध्यमातून सतत कार्यरत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आज लोक शिक्षा केंद्र द्वारा आपण पारधी वस्ती मध्ये शिक्षणाचे नवनवे प्रयोग करून येथील मुलांना शिक्षणाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था पातळीवर सतत प्रयत्नशील राहू असे आश्वासन संस्थापक विजय पचारे यांनी उद्घाटन प्रसंगी दिले तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा उषाताई भोसले यांनी या उपक्रमातुन आम्ही एक दिवस नक्कीच या वस्तीवर शाळा उभारू अशी इच्छा व्यक्त केली व संस्थेचे धन्यवाद मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन करतांना ग्रासरूट नेतृत्व विकास कार्यक्रमाचे फेलो सागर पायघन यांनी सांगितले की, या उपक्रमासाठी फळा आणि लेखन साहित्य ग्रामसेवक राहुल जुमडे व प्रमोद राऊत यांनी आर्थिक साहाय्य केले तर आभार करतांना संस्थेचे कार्यवाहक हनुमंत पचारे यांनी श्री गजेंद्रजी सुरकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ समन्वयक यांनी २०० पुस्तके, पंकज वाटकर बोपापुर यांनी ५० पुस्तके व सामाजिक कार्यकर्त्या रश्मी देशमुख यांनी ५० पुस्तके या लोकशिक्षा केंद्र करिता दिली. कार्यक्रमाच्या यशाकरिता गौरव काळमेघ व लोक शिक्षा तथा वाचन संस्कृती समिती, बहाद्दरपूर च्या विद्यार्थी यांनी श्रम घेतले.