Home सोलापुर वागदरी येथे मोफत  नेत्र तपासणीशिबीर संपन्न .

वागदरी येथे मोफत  नेत्र तपासणीशिबीर संपन्न .

55
0

वागदरी /नागप्पा आष्टगी

अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथे मानव विकास सेवाभावी संस्था पुणे व शिवाजी महाराज जन्मोत्सव मंडळ वागदरी यांच्या विद्यमाने वागदरी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर संपन्न झाला .या शिबीरात पाचशे रूग्णाची डोळे तपासणी करण्यात आले.

परमेश्वर मंगल कार्यालयात आयोजित या शिबीराचे उध्दघाटन श्रीशैल ठोंबरे यांचे हस्ते करण्यात आले.तर शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डाँ.सागर लेंभे पुणे यांच्या हस्ते करण्यात आला.या वेळी ग्रा प सदस्य सुनिल सावंत ,सिध्दार्थ सोशल फौंडेशनचे अध्यक्ष कमलाकर सोनकांबळे,मेजर परमेश्वर सावंत ,डाँ.नितीज पाटील ,गिरिष पाटील ,विरभद्र पुरंत ,महादेव सोनकावडे,मारूती शिंदे,राम मोरे,समर्थ सावंत ,अभिजीत सावंत ,विनोद सावंत मनोज सावंत,लखन मोरे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डाँ सागर म्हणाले की ,टी व्ही व मोबाईलच्या अति वापरामुळे लहान मुलांना डोळ्याचा त्रास सुरू होत आहे.त्या डोळ्याची काळजी घेणे गरजेचे आहे.शगर मुळे डोळ्यावर विपरित परिणाम होत आहे.डोळ्यातुन पाणी येणे,डोके दु:खणे ,जवळुन व लांबुन न दिसणे हे नंबरचे संकेत आहे.तेव्हा सर्वानी या आजाराकडे लक्ष देवुन तपासणी करून योग्य असल्याचे सांगितले.व काहीना शस्त्रक्रिया साठी पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.महादेव सोनकावडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.