Home मराठवाडा नांदेडचा संघ महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या राज्यस्तरिय अंतिम फेरीसाठी रवाना

नांदेडचा संघ महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेच्या राज्यस्तरिय अंतिम फेरीसाठी रवाना

240

नांदेड , दि.२४ :- ( राजेश भांगे ) – शासनाच्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या राज्यस्तरिय अंतिम फेरिसाठी नांदेड चे निळी टोपी हे नाटक पात्र ठरले असुन या राज्यस्तरिय अंतिम फेरीसाठी नांदेड चा संघ औरंगाबाद कडे रवाना झाला आहे . अतिम फेरिसाठी रवाना होण्यापुर्वी शुभेच्छा कार्यक्रमाचे मराठी अपडेटच्या वतिने आयोजन करण्यात आले होते.
यावेळी आ.मोहन हंबर्डे , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष नाथा चितळे , अखिल भारतीय नाटय परिषदेच्या नांदेड अध्यक्षा अपर्णा नेरलकर , स्पर्धा समन्वयक दिनेश कवडे , मराठी अपडेट चे संस्थापक तथा शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजक बापुसाहेब पाटील यांची यावेळी विशेश उपस्थिती होती . टोळी टोपी या नाटकाचे लेखक दिग्दर्शन राहुल जोंधळे यांच्या सह आदि सर्व कलावंताचे सत्कार करण्यात आले. तरी यावेळी प्रस्ताविक मराठी अपडेटचे बापुसाहेब पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन राजीव अंबेकर यांनी केले . यावेळी नाटय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.