Home विदर्भ 11 मार्च रोजी अस्तित्व फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेसह...

11 मार्च रोजी अस्तित्व फाउंडेशन तर्फे राज्यस्तरीय निबंध स्पर्धा व रांगोळी स्पर्धेसह मॅजिक शो चे आयोजन

885

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. २४ :- महिला दिनाचे औचित्य साधून अस्तित्व फाउंडेशन यवतमाळच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. निबंध स्पर्धेचा विषय कसा घडवाल आजचा युवक हा असून 18 वर्षा वरील युवती आणि महिलांसाठी ही राज्यस्तरीय खुली निबंध स्पर्धा आयोजिक करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांनी 4 मार्च पर्यंत स्वच्छ व सुंदर अक्षरात कागदाच्या एकाबाजुने निबंध लिहून पाठवावा. निबंध लिहितांना मराठी भाषेत लिहावा व शब्द मर्यादा 1500 ते 2000 पर्यंत असावी निर्णायक मंडळाचा निर्णय अंतिम राहणार असून या स्पर्धेमध्ये विजयी स्पर्धकांना प्रथम पुरस्कार 3001/- रुपये, द्वितीय पुरस्कार 2001/-, तृतीय पुरस्कार 1001/, चौथे पुरस्कार 501/- रुपये रोख व मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेचा निकाल 8 मार्च रोजी घोषित करण्यात येईल असे अस्तित्व फाउंडेशन च्या प्रेसिडेंट सौ. अल्का कोथळे यांनी कळविले आहे. तसेच 11 मार्चला रांगोळी स्पर्धेचे आयोजन सकाळी 9 ते 10 या वेळेत स्वच्छता अभियान, महिला अत्याचार, पाणी वाचवा पाणी आढवा या विषयावर जेष्ठ नागरिक भवन यवतमाळ येथे करण्यात आली आहे. निर्णायक मंडळाचा निर्णय अंतिम निर्णय राहील, विजयी प्रथम 3 स्पर्धकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल तसेच दुपारी 1 वाजता सुप्रसिद्ध जादुगर तेजा यांचा मॅजिक शो चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमात युवती व महिलांना प्रवेश निःशुल्क राहणार आहे. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रात सामाजिक काम करुन आपले अनमोल योगदान देणार्‍या 11 महानुभावांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येणार आहे. या आयोजना संदर्भात झालेल्या बैठकीत विविध समित्यांचे गठन करण्यात आले असून या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी कीर्ति राऊत, डॉ. कविता बोरकर, करुणा धानेवार, सारिका ताजने, माणिक पांडे, सरोज बरदेहे, डिंपल नक्षणे, योगिता शिरभाते, स्मीता दुर्गे, प्रजाक्ता टिकले आदि प्रयत्नशिल असून अधिक माहितीसाठी अध्यक्षा अस्तित्व फाउंडेशन कार्यालय ई/4 विदर्भ हाऊसिंग सोसायटी डॉ. बिडकर हॉस्पीटल जवळ माईंदे चौक यवतमाळ येथे संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा अल्का कोथळे व सचिव डॉ. कविता बोरकर यांनी केले आहे.