Home विदर्भ इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी शमशुद्दीन शेरअली लालानी यांची नियुक्ती

इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी शमशुद्दीन शेरअली लालानी यांची नियुक्ती

57
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ , दि. २४ :- इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते शमशुद्दीन शेरअली लालानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

19 फेब्रुवारी रोजी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित कार्यक्रमात या संघटनेचे राज्यअध्यक्ष बाळासाहेब सनस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते, याप्रसंगी शमशुद्दिन लालानी यांना इंटरनॅशनल ह्यूमन राइट्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्याची घोषणा करण्यात आली व राज्याध्यक्ष सनस यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.यावेळी नगरसेवक जावेद अंसारी,शमशुद्दीन लालानी, वसीम खान,ईस्माइल जिन्दानी.मकसूद अली,सृष्टि दिवटे,राहिल शेख,आदिनी राज्यअध्यक्ष यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.नवनियुक्त जिल्हाध्यक् शमशुद्दीन लालानी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. उपस्थितांना यावेळी सनस यांनी मार्गदर्शन केले.विशेष म्हणजे भारत सरकारच्या सहयोगाने व संविधानिक पद्धतीने राष्ट्रीय अध्यक्ष डेविड राज व विधिक समिति यांच्या मार्गदर्शनात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर मानवाधिकारसाठी ही असोसिएशन कार्यरत आहे.देशात 25 पेक्षा जास्त राज्यात याचे कार्यक्षेत्र विस्तारलेले आहे.यवतमाळ जिल्ह्यातही मानवाधिकार असोसिएशन चे कार्यविस्तार करून शासकीय, प्रशासकीय व सामाजिक स्तरावर होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघन,अन्याय,अत्याचार सारख्या प्रकाराविरूध्द संविधानिक पद्धतीने पीडितांना न्याय देण्याचे काम सुलभ होईल.असे मनोगत जिल्हाध्यक्ष शमशुद्दीन लालानी यांनी व्यक्त केले.