जनसंज्ञापन विभागातफै पत्रकारांचा सन्मान…
यवतमाळ / उमरखेड , दि. २४ :- पत्रकार हा आपल्या लेखनीद्वारे समाजाच्या प्रश्नावर शासनाला लक्ष केंद्रीत करण्यासाठी निर्भीडपणे वाचा फोडतो . लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेला पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य या देशामध्ये असुन समाजाला व शासनाला दिशा देण्याचे काम आजच्या घडीत पत्रकार करीत असल्याचे प्रतिपादन मुक्त विद्यापिठाचे विभागीय संचालक डॉ अंबादास मोहीते यांनी केले .
ते गो सी गावंडे महाविद्यालय अंतर्गत जनसंज्ञापन व वृतपत्रविद्या विभागातफै आयोजीत ” सन्मान चौथा स्तंभाचा ” व विभागाच्या अनियतकाली आत्मदर्पन चे प्रकाशन समारंभात बोलत होते .
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ या मा राऊत दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा कार्यालय प्रमुख तथा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप खडेकर, सौ उज्वला संदीप खडेकर, शिवाजी महाविद्यालय अमरावती चे प्राचार्य खडसे ,यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद यवतमाळ चे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर वद्राबादे उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद बांधकाम सभापती राम देवसरकर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विद्यार्थानाअभ्यासक्रमाचा वापर जिवन जगण्यासाठी करतांना ज्ञानकौशल्य प्रदर्शित करण्याची कला अंगीकारा असे आवाहन केले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेल्या आत्म दर्पण या अनियतकालिके चा प्रकाशन सोहळा आणि विविध पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष सचिव यासह पदाधिकारी आणि आणि विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा देखील पार पडला. या सोहळ्यामध्ये युवक महोत्सव मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा आणि महाविद्यालय मध्ये शिक्षण घेऊन आर्मी मध्ये गेलेल्या युवकांचा सत्कार देखील करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बालाजी लाभशेटवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अभय जोशी आणि प्रा. डॉ. धनराज तायडे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसंज्ञापन व वृत्तपत्र पदवी विभागाचे समंत्रक प्रा. संतोष मुडे, प्रा. सिद्धेश्वर जगताप , प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार , केंद्र सहाय्यक विकास माने, यांच्यासह सर्व सहकारी समंत्रक, महाविद्यालयाचे प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.