Home महत्वाची बातमी विद्यार्थानी ज्ञानकौशल्य प्रदर्शीत करण्याची कला आत्मसात करावी – राम देवसरकर

विद्यार्थानी ज्ञानकौशल्य प्रदर्शीत करण्याची कला आत्मसात करावी – राम देवसरकर

67
0

उमरखेड – प्रतिनिधी

यवतमाळ , दि. २४ :- स्थानिक गोसी गावंडे महाविद्यालयात जनसंज्ञापन व वृतपत्रविद्या पदवी शिक्षणक्रम, सन्मान चौथ्या स्तंभाचा , आत्मदर्पन प्रकाशन सोहळा या संयुक्त कार्यक्रमात यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा जिपचे अर्थ .व.बांधकाम सभापती राम .देवसरकर यांनी ग्रामीण भागातील पत्रकारीतेचा गौरव करतांनाच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील विद्यार्थानाअभ्यासक्रमाचा वापर जिवन जगण्यासाठी करतांना ज्ञानकौशल्य प्रदर्शित करण्याची कला अंगीकारा असे आवाहन केले .

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ या मा राऊत, विभागीय संचालक डॉ . अंबादास मोहीते , दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा कार्यालय प्रमुख तथा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप खडेकर सौ उज्वला संदीप खडेकर शिवाजी महाविद्यालय अमरावती चे प्राचार्य खडसे यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद यवतमाळ चे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर वद्राबादे उपस्थित होते .

प्रमुख मार्गदर्शक डॉ अंबादास मोहीते यांनी मुक्त विद्यापीठाचे शिक्षण घेतांना शार्टकटचा वापर करू नका कारण या विद्यापीठाचा उद्देशच हा गरीब , शोषीत, पिठीत , आदिवासी ,अपंग, आत्महत्याग्रस्त शेतकरी यांच्या पर्यंत पोचवणे व त्यांचे जिवनमान उंचावणे हा आहे पण काही षडयंत्री शक्ती शार्टकटच्या मार्गाने विद्यार्थाना ज्ञानापासुन वंचीत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत हे आपण ओळखले पाहीजे व मुक्त विद्यापीठातील ज्ञानाचा वापर करावा असे आवाहन केले . यावेळी अध्यक्षीय भाषणातुन डॉ . राऊत यांनी प्राध्यापक .लापशेटवार सरांचे तोंडभरून कौतुक केले तर संदीप खडेकर यांनी पत्रकारीतेच्या समस्या , अडचणीत्यावरील उपाय व आजच्या पत्रकारांची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन केले .

या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेल्या आत्म दर्पण या अनियतकालिके चा प्रकाशन सोहळा आणि विविध पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष सचिव यासह पदाधिकारी आणि आणि विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा देखील पार पडला. या सोहळ्यामध्ये युवक महोत्सव मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा आणि महाविद्यालय मध्ये शिक्षण घेऊन आर्मी मध्ये गेलेल्या युवकांचा सत्कार देखील करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बालाजी लाभशेटवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अभय जोशी आणि प्रा. डॉ. धनराज तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसंज्ञापन व वृत्तपत्र पदवी विभागाचे समंत्रक प्रा. संतोष मुडे, प्रा. सिद्धेश्वर जगताप , प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार , केंद्र सहाय्यक विकास माने, यांच्यासह सर्व सहकारी समंत्रक, महाविद्यालयाचे प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.