Home महत्वाची बातमी मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही –  प्रा. डॉ. अंबादास...

मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आज कोणत्याही क्षेत्रात मागे नाही –  प्रा. डॉ. अंबादास मोहिते

93
0

गावंडे महाविद्यालयात पार पडला आत्मदर्पण प्रकाशन आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा

उमरखेड , दि. २४ :- यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा विद्यार्थी आज कोणत्याही क्षेत्रात मागे राहिलेला नाही असे प्रतिपादन विभागीय संचालक प्रा डॉ अंबादास मोहिते यांनी केले ते गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या पदवी शिक्षणक्रमाच्या वतीने आयोजित आत्मदर्पण अनियतकालिकाचा प्रकाशन सोहळा आणि पत्रकार सन्मान सोहळ्यात मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे सचिव डॉ या मा राऊत दैनिक पुण्यनगरीचे जिल्हा कार्यालय प्रमुख तथा श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप खडेकर सौ उज्वला संदीप खडेकर शिवाजी महाविद्यालय अमरावती चे प्राचार्य खडसे यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद यवतमाळ चे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकार गावंडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस आर वद्राबादे उपस्थित होते मोहिते समोर बोलताना म्हणाले की मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून ज्ञानगंगा घरोघरी पोहोचविण्याचे कार्य सुरू आहे आणि तळागाळातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना शिक्षित करून बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्ना कडे विद्यापीठ वाटचाल करीत आहे त्यांच्या भाषणातून त्यांनी चौफेर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना व उपस्थितांना मोहीतच केले होते.
संदीप खडेकर यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पत्रकारिता शिक्षणक्रमाचे असलेले पुस्तके विशेष वाचनीय असून त्यामधून पत्रकारिता क्षेत्रात काम करतांना पुस्तकांचा निश्चितच फायदा होतो आणि तो मी अनुभवला आहे असे यावेळी खडेकर म्हणाले.
डॉ राऊत यांनी गेल्या 56 वर्षातील महाविद्यालयाचा विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत चाललेला असून आमचे विद्यार्थी अमेरिकेच्या संलग्नित विद्यापीठात जाऊन अभ्यास आणि संशोधन करतात यापेक्षा मोठे काय असावे ? असे आपल्या भाषणातून सांगितले.
राम देवसरकर यांनी सुद्धा आजच्या काळामध्ये सुद्धा प्रिंट मीडिया एवढे भान इलेक्ट्रॉनिक मीडिया जपत नसल्याचे निदर्शनास आणून दिले वृत्तपत्राच्या बातमी मध्ये पूर्ण माहितीच्या आधारे वरच बातमी प्रकाशित करण्यात येते तर इलेक्ट्रॉनिक माध्यमांमधून प्रत्येक चॅनलवर एकाच बातमीची वेगवेगळी ब्रेकिंग न्यूज च्या नावाखाली बातमी प्रसारित होत असते. त्यामुळे वृत्तपत्रांना आजही समाजात मोठे स्थान असल्याचे देवसरकर म्हणाले.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिकाचा भाग असलेल्या आत्म दर्पण या अनियतकालिके चा प्रकाशन सोहळा आणि विविध पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष सचिव यासह पदाधिकारी आणि आणि विविध वृत्तपत्रात काम करणाऱ्या संपादक आणि पत्रकारांचा सन्मान सोहळा देखील पार पडला. या सोहळ्यामध्ये युवक मोर्चामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थिनींचा आणि महाविद्यालय मध्ये शिक्षण घेऊन आर्मी मध्ये गेलेल्या युवकांचा सत्कार देखील करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बालाजी लाभशेटवार यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.अभय जोशी आणि प्रा. डॉ. धनराज तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसंज्ञापन व वृत्तपत्र पदवी विभागाचे समंत्रक प्रा. संतोष मुडे, प्रा. सिद्धेश्वर जगताप , प्रा. लक्ष्मीकांत नंदनवार , केंद्र सहाय्यक विकास माने, यांच्यासह सर्व सहकारी समंत्रक, महाविद्यालयाचे प्राध्यापक , कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.