Home उत्तर महाराष्ट्र जिवंत जाळलेल्या त्या महिलेचा आखेर झाला मृत्यू

जिवंत जाळलेल्या त्या महिलेचा आखेर झाला मृत्यू

122

मृत्यू शी झुंज अपयशी

अमीन शाह

नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील बस स्थानकावर गेल्या आठवड्यात एका महिलेस पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते या घटनेत ही महिला 67 टक्के भाजली होती या महिलेवर पहिले नाशिक नंतर जे , जे , हॉस्पिटल मुंबई येथे उपचार केले जात होते परंतु काल मध्यरात्री या महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली त्याचे दुःखद निधन झाले आहे , सदर महिलेचे शव हे त्याच्या मूळ गावी आज आणण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे , सदर महिलेचे हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजले होते संपूर्ण राज्यात महिला सुरक्षे साठी कठोर पावले उचलण्याची नित्तांत गरज असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या या प्रकरणी महिलेचा पती , त्याचे दोन मित्र पट्रोल पंप चालक कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता , ही मनाला चटका लावून जाणारी घटना आहे सर्वत्र दुःख वयकत केले जात आहे .