Home जळगाव महाशिवरात्रि च्या उपासात विवाहित शिक्षिकेची मुला समोरआत्महत्या….!!

महाशिवरात्रि च्या उपासात विवाहित शिक्षिकेची मुला समोरआत्महत्या….!!

266

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील इंदिरा नगर परीसरात एका सव्वीस वर्षीय विवाहीत शिक्षिकेची मुला समोर आत्महत्या ने खळबळ उडाली आहे.

शहरातील इंदिरा नगर भागातील भररस्तायावर असलेल्या घरात सृष्टि स्वप्निल साळुखे हिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जेव्हा आत्महत्या करत होती तेव्हा तिन वर्षाचा तिचा मुलगा घरा बाहेर खेळत होता. ह्रदययाला हेलावणारी घटनेत मयताचा दिवसभर चा महाशिवरात्री चा उपास असल्याचे समजते मयताचे सासर खेडगांव ता. चाळीसगाव येथील होते तर पती स्वप्निल वनराज साळुखे हे शिंदे इंटरनॅशनल स्कूल मध्ये शिक्षक आहे. मयताचे माहेर बडोदा येथील आहे. आज दि. २१ रोजी सायंकाळी ४.३० ते ५ दरम्यान आत्महत्या झाली असावी असे समजले. घटनास्थळी पीएसआय दत्तात्रय नलवाडे, गणेश चौबे, विजया वसावे एएसआय चंद्रकांत पाटील,पो. कॉ. राहुल बेहरे, नरेंद्र नलवाडे,सहाय्यक फौजदार दामोदर सोनार यांनी भेट देऊन मयताचा सिलींग फॅन लटकलेला मृतदेह खाली उतरवला. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
घराबाहेर खेळणारा देवांश याला किंचित ही कल्पना नव्हती की आपली आई जिव देत आहे काही क्षणातच देवांश पोरका झाला.