Home विदर्भ हिगणंघाटच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कांग्रेस चे माजी आमदार राजू तिमांडे...

हिगणंघाटच्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कांग्रेस चे माजी आमदार राजू तिमांडे यांच्या घरावर मोर्चा.!

11
0

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा , दि. २२ :- देशात असंविधानिक CAA, NRC, NPR, कायदयाच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्व मताने ठराव मंजूर करून या NPR, NRC, रद्द करावा अशी विनंती मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली.
देशातील गैर भाजपा राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावून या कायद्याच्या विरोधात ठराव पारित केला आहे. आज राज्यात महाआघाडीचे सरकार आहे या आघाडीत प्रमुख पक्ष कांग्रेस आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष सत्तेत आहे.
या दोन्ही पक्षाचा काळ्या कायद्याला विरोध आहे तर त्यांनी विशेष विधानसभा अधिवेशन बोलावून NPR, NRC,रद्द केली पाहिजे येत्या एक मे पासून या कायद्याची अंमलबजावणी होत आहे ही अंमलबजावणी लवकरात लवकर थांबविण्यात यावी, जर हा कायदा थांबला नाही तर राज्यातील 40%SC ST OBC सहित मुस्लिम अल्पसंख्यांक घोक्यात येतील,
आज देश आर्थिक संकटात सापडला आहे बेरोजगारी शिक्षा भष्ट्राचार दलित ओबीसी ST समाजावर होणारे अत्याचारा पासून जनतेची दिशाभूल करण्यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने NPR, NRC विरोधी ठराव विधानसभेत मांडून बहुमताने पारित करून घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या विनंती करित असून या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष कुणाल वासेकर अशोक रामटेके ललित धनविज अजय डांगरे विक्रांत भगत सुहास जीवनकर श्याम कांबळे वसंत जगताप देवाचंद शिंपी अविनाश उमरे संजय जामूनकर अशोक काळे रेखांनद मून आनंद जणबंधु यशवंत शंभरकर रायभान पाटिल निलेश चाणकापुरे राजीक शेख निखिल गावंडे राजेश जगताप इत्यादी उपस्थित होते.