Home महत्वाची बातमी आखेर प्रहार चे तुषार पुंडकर यांचा मृत्यू   “रात्री झाला होता गोळीबार”

आखेर प्रहार चे तुषार पुंडकर यांचा मृत्यू   “रात्री झाला होता गोळीबार”

115

अमीन शाह / देवानंद खिरकर

अकोल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर काल दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला होता. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. गोळीबारानंतर दोन्ही हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढलाय. विशेष म्हणजे घटनास्थळापासून अकोट शहर पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर आहे.
या हल्ल्यात मारेकरींनी पूंडकर यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या यातील दोन गोळ्या तुषार पुंडकर यांच्या पाठीत लागल्याय.. गंभीर जखमी झालेल्या तुषार फुंडकर यांना अकोट येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र डॉक्टरांनी पुढील उपचार करिता अकोला नेण्याचा सल्ला दिला होता. मात्र उपचारादरम्यान त्यांचा अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळावर एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.

तुषार फुंडकर अकोलाचे पालकमंत्री बच्चू कडू यांचे विश्वासू होते…हत्येमागचं कारण अद्यापही समोर आले नाही मात्र तुषार पुंडकर यांच्या माध्यमातून प्रहार संघटनेने जिल्ह्यात चांगली प्रगती करायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे हत्या राजकीय द्वेषातून करण्‍यात आली आहे का ? या अनुषंगाने देखील पोलिस पुढील तपास करीत आहे.

सोबतच काही दिवसांपूर्वी अवैध उत्खनन करणाऱ्यांची लेखी तक्रार पुंडकर यांनी संबंधित विभागाला दिली होती. त्यामुळे पोलीस या बाबतही तपास करीत आहे. पालकमंत्री बच्चू कडू यांनी मारेकरी लवकरच अटक करण्यात येईल अशी गव्हाई काल दिली होती. याप्रकरणी अकोट शहर पोलीसांनी आरोपींच्या धरपकडीसाठी काल रात्रीपासूनच सुरुवात केलीय.