Home मराठवाडा नायगांव (बा.) च्या आमदारांनी दिले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाची मदत

नायगांव (बा.) च्या आमदारांनी दिले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाची मदत

117

नांदेड , दि.२१ :- ( राजेश भांगे ) –
नाययगांव ( बा.) मतदार संघाचे विद्य.आमदार मा. राजेश पवार यांनी दि.२० फेब्रुवारी रोजी त्यांच्या मतदार संघातील नायगांव तालुका मौजे ताकबीड येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अनिल कुरे यांच्या कुटुंबाची भेट घेवुन शासनाची मदत एक लक्ष रूपये चे धनादेश मयताची पत्नी आश्विनी अनिल कुरे यांना दिले. व मयतांच्या कुटुंबास ज्या कुटल्या शासकिय योजनेचा आपल्या ला लाभ देता यईल त्या सर्व योजना त्यांना देण्यात यावे अशा प्रकारच्या सुचना यावेळी नायगांवच्या तहसिलदार नांदे मँडम यांना दिल्या. तरी यावेळी
तहसिलदार सौ.सुरेखा नांदे मॕडम, ताकबीड चे सरपंच शिवराज वरवटे , भाजपा तालुका अध्यक्ष श्री.कोंडीबा पाटील शिंदे,तलाठी ,मंडळ अधिकारी व गावकरी मंडळी आदिंची उपस्थिती होती.