Home जळगाव मुबई एमपीआयएम मॅरेथॉनमध्ये भुसावळचे संजू भटकर व गणसिंग पाटील यांचा सहभाग

मुबई एमपीआयएम मॅरेथॉनमध्ये भुसावळचे संजू भटकर व गणसिंग पाटील यांचा सहभाग

129
0

प्रतिनिधी – लियाकत शाह

भुसावळ , दि. २२ :- मुंबई येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पोलिस इंटरनॅशनल मॅरेथॉन २०२० मध्ये भुसावळ स्पोर्ट्स रनिंग असोसिएशनचे संजू भटकर व गणसिंग पाटील यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पोलिस महासंचालक सुबोधकुमार जैस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच १६, २१ आणि ४२ किलोमीटर या गटात महाराष्ट्र पोलिस इंटरनॅशनल मॅरेथॉन पार पडली. मुंबईतील सी.लिंक ते गेटवे ऑफ इंडिया असा मार्ग होता. पहाटे पाच वाजता या स्पर्धेस सुरुवात झाली. त्यात वीस हजार धावपटूंनी सहभाग नोंदविला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेते अक्षय कुमार, अजय देवगन, दिग्दर्शक रेमो, टायगर फर्नांडीस, ना. आदित्य ठाकरे यांची तर रेस डायरेक्टर म्हणून विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांची उपस्थिथी होती. दोघा धावपटूंचा सत्कार दोन्ही धावपटूंचा शिक्षण विभागातर्फे गटशिक्षणाधिकारी तुषार प्रधान, इब्टाचे अध्यक्ष आर.आर. धनगर, एस.एस.अहिरे, मुख्याध्यापक अरुण धनपाल, जे.पी.सपकाळे, सुनील वानखेडे, क्रीडा संघटनेचे प्रदीप साखरे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांना बिसाराचे अध्यक्ष प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleनायगांव (बा.) च्या आमदारांनी दिले आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासनाची मदत
Next articleनाशिक विभागत बदली धोरण अभ्यास गट समितीची बैठक संपन्न…!
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here