Home बुलडाणा खेळतांना चिमिकली बाटलीत बुडाली झाला मृत्यू

खेळतांना चिमिकली बाटलीत बुडाली झाला मृत्यू

149
0

दुःखद घटना…

अमीन शाह

खामगाव , दि. २१ :- खेळत असतांना भरलेल्या पाण्याच्या बकेटमध्ये बुडून दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही घटना २१ पेâबु्रवारी रोजी सकाळच्या सुमारास पारखेड येथे उघडकीस आली.
खामगाव तालुक्यातील पारखेड येथील सागर सावळे यांची दीड वर्षीय चिमुकली कु. चंचल सावळे ही सकाळच्या सुमारास खेळत असतांना ती खेळत – खेळत बाथरुमध्ये गेली व तेथे पाण्याने भरलेल्या मोठ्या बकेटमध्ये तोल जावून पडली व त्यामध्ये बुडून तिचा मृत्यू झाला. बाथरुम घराबाहेर अंगणात असल्याने ही घटना कुणाच्याही निर्दशनात आली नाही. थोड्या वेळाने चिमुकली पाण्यात पडलेली दिसून आल्याने आई – वडिलांनी तातडीने तिला उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. मात्र वैद्यकीय अधिका-यांनी तपासणी करुन मृत घोषित केले.याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे.